Palestinian Civilians : इजिप्त सीमेवरून येणारी मानवतावादी मदत इस्राईलने थांबवली आहे. यामुळे गाझा पट्टीतील नागरिकांना अन्न-पाणी आणि औषधांची तूट भासत असून लहान मुलांनाही अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
खान युनिस : शस्त्रसंधीच्या सहा आठवड्यांच्या टप्प्यात काही अपहृतांची सुटका झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी बोलणी करण्याऐवजी इस्राईलने गाझा पट्टीत पुन्हा हल्ले सुरू केल्याच्या घटनेलाही आता दोन महिने पूर्ण होत आले आहेत.