नवलच! माणसांसारखेच प्राणीही करत आहेत सूर्यनमस्कार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

जगामध्ये माणसांशिवाय आणखी एक प्राणी आहे, जो सूर्याला नमस्कार करत आहे. तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.  

पुणे : अनेकजण रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार करत असतात. परंतु तुम्हाला असे वाटतं असेल की फक्त आपणच सूर्यनमस्कार करतो. तर तुम्ही चुकीचे आहात. सोशल मीडियावर असा फोटो व्हायरल होत आहे ते पाहून तुम्हाला कळेल की जगामध्ये माणसांशिवाय आणखी एक प्राणी आहे, जो सूर्याला नमस्कार करत आहे. तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.  

बर्‍याच वेळा, कॅमेरामॅन प्राण्यांचे असे काही क्षण कॅमेर्‍यामध्ये क्लिक करतात. आपल्याला ते पाहतच बसावे असे वाटते. हत्तीचा नकळत क्लिक केलेले कॅन्डिडेड शॉट्स आहेत. या फोटोंची कायमस्वरूपी हृदयात जागा तयार होऊन जाते. वन्य सेवेतील अधिकारी सुशांत नंदा यांचा जवळजवळ सर्व वेळ सुंदर वन्यजीव पक्षी आणि प्राणी यांच्यासह घालवला जातो. ते ट्विटरवर सुंदर वन्यजीव पक्षी आणि प्राणी यांचे खूप सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात आणि ते प्रचंड व्हायरल होतात.

 

आईएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर एक हत्तींचा फोटो शेयर केला आहे. हा फोटो पाहून असे वाटत आहे की, हा हत्ती सूर्यनमस्कार करत आहे. हा फोटो व्हायरल होतो आहे. हा व्हायरल फोटो पाहून अचानक असाच विचार तुमच्या मनात येईल. हा हत्तीचा नकळत केलेला शॉट योग्य वेळी कॅच केला आहे. 

सुशांत नंदा यांनी फोटोवर हत्तीचे सूर्यनमस्कार असे वर्णन केले आहे. सोशल मीडियाचे यूजर्स या व्हायरल फोटोवर आप आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे अनेकांना हा फोटो आवडला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like humans elephants are Sun salutation