मोदींबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे : असद दुर्रानी 

पीटीआय
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे हाताळतील याबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. प्रत्येक घटनेच्या आधारावर या भूमिकेची पडताळणी होईल, असे आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्रानी यांनी म्हटले आहे. 

दुर्रानी म्हणाले, की सध्याची स्थिती पाहिली तर परस्परांच्या भूमिकांबाबत अंदाज बांधणे आणि माध्यमांच्या चर्चेत राहणे असेच दिसते. या दोन्ही बाबी राजकीयदृष्ट्या फायदेशीर आहेत. मात्र संबंध टिकवण्याचा विचार केल्यास विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या संवेदनशील मुद्द्यांच्या विरोधात ही बाब आहे. "पाकिस्तान अड्रिफ्ट : नेव्हिगेटिंग ट्रबल्ड वॉटर्स' या पुस्तकात या बाबींचा उल्लेख दुर्रानी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले, की नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देणे, पुन्हा आरोप- प्रत्यारोप करणे, उभय देशांतील प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव निर्माण होणे, कोणते ना कोणते कारण सांगून परराष्ट्र सचिवांची बैठक रद्द करणे, काबूलमध्ये पाकिस्तानवर आरोप करून अचानक लाहोरला पोचणे आदी भूमिका या कालापरत्वे झाल्याचा दावा दुर्रानी यांनी पुस्तकात केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तोडग्याचा विषय येतो तेव्हा भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुद्द्याचा बचाव करेल, असे दुर्रानी यांनी म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hurry to make a conclusion about Modi : Asad Durrani