ऐकावं ते नवलचं! बायकोच्या अफेयरचं पडलं स्वप्न; संशयित पतीनं थेट पत्नीला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐकावं ते नवलचं! बायकोच्या अफेयरचं पडलं स्वप्न; संशयित पतीनं थेट पत्नीला...

ऐकावं ते नवलचं! बायकोच्या अफेयरचं पडलं स्वप्न; संशयित पतीनं थेट पत्नीला...

सध्या जगामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात काही घटना या अचंबित करणाऱ्या घडतात आणि त्याची चर्चा सर्वदूर होते. अशीच एक घटना उघडकीस आली असून, त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचं झालं असं की, एका संशयी नवऱ्याला त्याच्या पत्नीचं परपुरुषाशी संबंध असल्याचे स्वप्न पडले. ते त्याने खरं मानलं आणि थेट पत्त्नीवर हल्ला करून तिला भोसकलं. यामध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर आणि संशयित पतीला अटक केली आहे. ही घटना ब्राझिलच्या प्लॅनाल्टिना शहरातील आहे.

स्वप्न पडल्यानंतर हल्लेखोर पतीला आपल्याशिवाय पत्नी परपुरुषाचा कसा काय विचार करू शकते असा प्रश्न पडला. त्यानंतर त्याने याबाबत पत्नीला विचारणादेखील केली. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचे भांडण झाले. पत्नीनं नवऱ्याला त्याला पडलेलं स्वप्न आणि वास्तव यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे समजावून सांगण्याचा मनापासून प्रयत्न केला. मात्र, पती महाशयांनी वास्तव खरं न मानता स्वप्नावर विश्वास ठेवला.

भांडण करून थांबेल तो नवरा काय त्याने रागाच्या भरात थेट चाकूने पत्नीला भोसकलं. यात संबंधित महिलेला हातावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. पतीकडून अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पत्नी भयभीत झाली. घटनेनंतर हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.

Web Title: Husband Seen Her Wife Affair With Other Men In Dream

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..