नोबेलसाठी मी पात्र नाही : इम्रान खान

वृत्तसंस्था
सोमवार, 4 मार्च 2019

'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशाला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता. 4) केले. 

इस्लामाबाद : 'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशा व्यक्तीला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता. 4) केले. 

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून सुटका झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला होता. पण हाच प्रस्ताव खुद्द इम्रान खान यांनी नाकारला आहे.

पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-महंम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने कारवाई केली. तसेच या भागात असणारे दहशतवादी तळ नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमानं घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. भारताचे मिग-21 हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am not able for Nobel award says Pakistan PM Imran Khan