"मला श्‍वास घेता येत नाही'; हत्येपूर्वीचे खाशोगींचे अखेरचे शब्द

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मला श्वास घेता येत नाही, हे जमाल खाशोगी यांचे अखेरचे शब्द होते, असा दावा सीएनएनने दिलेल्या वृत्तात करण्यात आला. सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासामध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीचे ध्वनिमुद्रण हाती लागले आहे. या ध्वनिमुद्रणाच्या शब्दांकनाची प्रत वाचलेल्या व्यक्तीच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.
 

वॉशिंग्टन- मला श्वास घेता येत नाही, हे जमाल खाशोगी यांचे अखेरचे शब्द होते, असा दावा सीएनएनने दिलेल्या वृत्तात करण्यात आला. सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासामध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीचे ध्वनिमुद्रण हाती लागले आहे. या ध्वनिमुद्रणाच्या शब्दांकनाची प्रत वाचलेल्या व्यक्तीच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.

त्यामुळे खाशोगी यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता, हे सिद्ध होते, असा दावा वृत्तात करण्यात आला; तसेच खाशोगी यांनी हत्येवेळी अनेकदा याबाबतची माहिती देण्यासाठी फोन करण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. 

सौदीतील प्रसिद्ध पत्रकार असलेले जमाल खाशोगी हे सध्या अमेरिकेत वास्तव्याला होते. त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्वही होती. कधीकाळी ते सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे निकटवर्तीय होते. मात्र, युवराज सलमान यांच्या धोरणांवर खाशोगी जोरदार टीका करत होते. त्यामुळे युवराज सलमान यांच्या सांगण्यावरून खाशोगी यांचा काटा काढण्यात आल्याचा आरोप तुर्कस्थानकडून करण्यात येत आहे. इस्तंबूलमधील सौदीच्या वाणिज्य दूतावासामध्ये प्रवेश केल्यानंतर खाशोगी बेपत्ता झाले होते. मात्र, या ठिकाणीच त्यांची सौदीच्या अधिकाऱ्यांनी हत्या केल्याची माहिती नंतर समोर आली होती. सुरवातीला सौदीने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, त्यानंतर खाशोगी यांची हत्या चुकून झाल्याचा दावा सौदीकडून करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Cant Breathe Were Khashoggis Final Words Sounds Of Saw On Tape