VIDEO : गोळीबारातून इम्रान वाचला याचं मला दुःख वाटतंय, हल्लेखोरानं दिली धक्कादायक कबुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan Latest News

इम्रानवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचं वक्तव्य समोर आलं आहे.

VIDEO : गोळीबारातून इम्रान वाचला याचं मला दुःख वाटतंय, हल्लेखोरानं दिली धक्कादायक कबुली

Imran Khan Latest News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या लाँग मार्चमध्ये गुरुवारी एका व्यक्तीनं गोळीबार केला. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, या घटनेत इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागलीय. ते जखमी असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेत इम्रान यांच्या 'पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षा'चे (पीटीआय) खासदार फैजल जावेद यांच्यासह त्यांचे 4 कार्यकर्ते जखमी झालेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक केलीय. ‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील वजिराबाद (Punjab Wazirabad) इथं ही घटना घडली. इम्रान उभ्या असणाऱ्या कंटेनरजवळ गोळीबार झाला. PTI नेते इम्रान इस्माइलनं सांगितलं की, इम्रान खान यांच्या पायात 3 ते 4 गोळ्या लागल्या आहेत.

हेही वाचा: Accident : दिवाळी, छठपूजा संपवून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; बस-कारच्या धडकेत 11 जण ठार

'इम्रान हल्ल्यातून वाचल्याचा मला खेद वाटतो'

दरम्यान, इम्रानवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचं वक्तव्य समोर आलंय. एका व्हिडिओमध्ये हल्ला करणार्‍या व्यक्तीनं सांगितलं की, ‘मी एकट्यानंच हा हल्ला केला होता. मात्र, इम्रान खान या हल्ल्यातून वाचल्याचा मला खेद वाटतो, असं त्यानं सांगितलंय. या हल्ल्यानंतर इम्रानच्या पक्षानं देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. गुरुवारच्या रात्रीपासून पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये लष्कराच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत.

हेही वाचा: Benjamin Netanyahu यांना सत्ता मिळताच इस्रायलवर हल्ला; गाझा पट्यातून डागले 4 रॉकेट

'इमरान वाचला याचं मला दुःख आहे'

यावेळी हल्लेखोर म्हणाला, मला संधी मिळाली तर पुन्हा हे कृत्य करेन. इमरान वाचला याचं मला दुःख आहे. माझं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलं नाही. इम्राननं स्वतःची तुलना मोहम्मद पैगंबर (Muhammad Prophet) यांच्याशी केली. इमरान म्हणाला होता की, मोहम्मद पैगंबर यांनी ज्या प्रकारे आपल्या लोकांना संदेश दिला, तोच संदेश मी तुम्हाला देत आहे. म्हणजेच, तो स्वतःची तुलना पैगंबराशी करत आहे. त्याचं हे बोलणं मला सहन झालं नाही. माझ्यासाठी प्रेषित मोहम्मद हे शेवटचं पैगंबर आहेत. तो स्वतःची त्यांच्याशी तुलना कशी करू शकतो? मला हे आवडलं नाही. तेव्हापासून मी त्याला मारायचं ठरवलं होतं.

हेही वाचा: Pakistan : गोळीबार झालेल्या Imran Khan ची तब्येत आता कशीय? जाणून घ्या हल्ल्याशी संबंधित 5 मोठे अपडेट्स

'इम्रानवर हल्ला करण्यासाठी 20 हजारांना शस्त्रं विकत घेतलं'

जेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या विचारसरणीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं की, तो डॉ इसरार अहमदचे व्हिडिओ नेहमी ऑनलाइन ऐकतो. इम्रानवर हल्ला करण्यासाठीचे शस्त्र मी 20 हजार रुपयांना विकत घेतलं होतं. इम्रान खान हे एकच माझं लक्ष्य होतं. म्हणूनच, मी इतर कोणावर गोळीबार केला नाही, असं त्यानं नमूद केलं. दरम्यान, इम्रान खानच्या हल्लेखोराचं वक्तव्य सार्वजनिक करणं अनेक अधिकाऱ्यांना भारी पडलंय. पाकिस्ताच्या पंजाबचे मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी पंजाब पोलिसांच्या आयजींना बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. याचवेळी पीटीआयच्या नेत्या डॉ. यास्मिन रशीद (Dr. Yasmin Rasheed) यांनी सांगितलं की, इम्रान खान यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या आहेत. ऑपरेशननंतर इम्रान खान धोक्याबाहेर असल्याची माहिती नंतर पाकिस्तानी माध्यमांनी दिली.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

टॅग्स :Pakistanimran khan