आता मी कोणाचाही किस घेऊ शकतो; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

कोरोनातून बरे झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रचाराचा धडाका सुरु केला आहे.

वॉशिंग्टन- कोरोनातून बरे झालेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. फ्लोरिडामध्ये झालेल्या सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो आहे, आता मी इम्यून आहे. मला खूप ताकदवर वाटत आहे. मी तुमच्या तेथे चालत येऊ शकतो. सभेतील प्रत्येकाचा मी चुंबन घेऊ शकतो. सभेतील पुरुष आणि सूंदर स्त्रियांचे मी चुंबन घेऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले आहेत. 

ट्रम्प यांनी कोविडवर उपचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रचारात उतरले आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर मी स्वत:ला अजून शक्तीशाली समजत आहे, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान व्हाइट हाऊसच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याचे सांगितले. प्रेस सेक्रेटरी कॅली मॅक्नेनी यांनी एका निवेदनात म्हटले, की अध्यक्षांनी सलग दोन दिवस कोविड चाचणी केली असून ती निगेटिव्ह आली आहे.

PVCआधारकार्ड टिकाऊ आणि हाताळायला सोपे; घरबसल्या मागवता येणार!

ट्रम्प यांनी यावेळी आपले प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक तडजोडी केल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ज्यो बायडेन यांनी समाजवादी, मार्क्सवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हाती डेमोक्रॅटिक पक्ष सोपवला. त्यांच्याकडे आता शक्तीच राहिली नाही. जर बायडेन यांचा विजय झाला तर डाव्या विचाराचे लोक देश चालवतील. त्यांना अगोदरच सत्तेची लालसा आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी टीका केली. ते निवडून आले तर देवच आपल्याला वाचवू शकेल. कारण सत्ता त्यांच्याकडे गेली तर पूर्वीसारखे अमेरिकेचे वैभव राहणार नाही. आपला देश पूर्ववत होऊ शकणार नाही, असाही दावा त्यांनी केला. 

बायडेन यांच्यावर धनाढ्य देणगीदारांच्या आणि कट्टरपंथीयांचा पगडा आहे. या मंडळींनी आपली नोकरी बाहेरच्या मंडळींना दिली आहे. आपले कारखाने बंद पाडले आणि सर्वांसाठी सीमा खुल्या केल्या. अंत नसलेल्या युद्धावर आपल्या जवानांचा बळी दिला आणि या लोकांसाठी आपले शहर लुटण्यासाठी मोकळे ठेवले. आत आपले सैनिक परत येत आहेत. बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष हे लोकांच्या नोकऱ्या संपवतील. पोलिस खात्याला गुंडाळून ठेवतील आणि सीमा खुल्या करतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. भ्रष्टाचारी मंडळी कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत. परंतु आम्ही त्यांच्या मार्गावर उभे आहोत. अमेरिकी कामगार, अमेरिकी कुटुंब आणि अमेरिकेचे स्पप्न साकार करण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे ट्रम्प यांनी नमूद केले. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will kiss the guys and the beautiful women said donald trump after corona recovery