PVCआधारकार्ड टिकाऊ आणि हाताळायला सोपे; घरबसल्या मागवता येणार!

PVC Aadhar Card
PVC Aadhar Card

नवी दिल्ली : तुमच्या पाकीटात मावेल असे एटीएम कार्डच्याच साईझचे नवे PVC आधार कार्ड आता अनेक फिचर्ससह उपलब्ध होणार आहे. नव्या सिक्यूरीटी फिचर्ससह हाताळायला सोपे आणि टिकाऊ असे आधार कार्ड आता लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती UIDAI या 'आधार' संस्थेने ट्विट करुन दिली आहे. 

हे आहेत नव्या PVC आधार कार्डचे फायदे
1. जास्तकाळ टिकाऊ आणि हाताळायला सोपे
2. लॅमिनेशनसह चांगली प्रिटींग क्वॉलिटी 
3. अत्याधुनिक सिक्यूरिटी फिचर्स. यात होलोग्राम, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्टचा समावेश 
4. PVC पासून बनल्यामुळे हे कोणत्याही वातावरणात टिकाऊ आहे. खराब होण्याची शक्यता नसल्याने आपण ते सहजतेने विनासायास हाताळू शकता. 
5. QR कोडचा वापर करुन हे आधार कार्ड ऑफलाईन पद्धतीने सहजतेने व्हेरिफाय करु शकता.
6. कार्डवर इश्यू डेट आणि प्रिट डेट अशा दोन्ही तारखा असतील.
7. या PVC आधार कार्डवर आधारचा लोगो एम्बोस्ड पद्धतीने कोरलेला असेल. 

PVC आधार कसे मागवाल?
UIDAI ने आपल्या वेबसाईटवर 'Order Aadhaar Card' असा पर्याय दिला आहे. यावर जाऊन आपण माफक दरात आपले PVC आधार कार्ड मागवू शकता. ज्यांचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नाहीये असेही लोक इतर मोबाईल नंबरवरुन हे आधार कार्ड मागवू शकतात. 

PVC आधार कार्ड मागवल्यावर ते कसे ट्रॅक कराल?
 www.uidai.gov.in या वेबसाईटवर 'My Aadhaar' असा  पर्याय आहे. ज्यावर आपण आपल्या कार्डची प्रक्रीय कुठवर आली आहे, याचा तपशील पाहून ते ट्रॅक करु शकता. My Aadhaar या पर्यायामध्ये गेल्यावर 'Check Aadhaar PVC card status' असा पर्याय येईल. यामध्ये आपल्याला 28 अंकी SRN आणि 12 अंकी आधार नंबर सोबत कॅपचा कोड टाकावा लागेल. यानंतर आपण आधार कार्ड ट्रॅक करु शकाल. 

PVC कार्ड मिळायला किती दिवस जातील?
आधारने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हे कार्ड आपल्याला ज्या दिवशी मागणी केली आहे तो दिवस वगळून आणखी पाच कार्यालयीन दिवसांतच मिळून जाईल. हे कार्ड आपल्याला स्पीड पोस्ट सेवेने घरपोहोच मिळेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com