Pakistan News | "स्वतःचे कपडे विकून लोकांना..."; पाकिस्तानचे पंतप्रधान आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahbaz Sharif
"स्वतःचे कपडे विकून लोकांना..."; पाकिस्तानचे पंतप्रधान आक्रमक

"स्वतःचे कपडे विकून लोकांना..."; पाकिस्तानचे पंतप्रधान आक्रमक

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी आता महागाईविरोधात मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला आहे. गव्हाच्या पीठाचे दर तात्काळ कमी करा नाहीतर मी माझे कपडे विकून लोकांना गव्हाचं पीठ पुरवेन, असा सज्जड दम शहबाझ शरीफ यांनी भरला आहे. ठकारा स्टेडियममध्ये काल आयोजित केलेल्या बैठकीत शरीफ बोलत होते. (Pakistan PM Shahbaz Sharif on inflation in country)

हेही वाचा: इम्रानना हवी होती झरदारींची मदत

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना शहबाझ शरीफ (Pakistan PM Shahbaz Sharif) यांनी अल्टिमेटम दिला आहे. जर गव्हाच्या पीठाचे दर पुढच्या २४ तासांत ४०० रुपयांवरून १० रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाले नाहीत तर, मी माझे कपडे विकेन आणि स्वतःला लोकांना स्वस्त पीठ उपलब्ध करून देईन, असं शरीफ म्हणाले आहेत.

हेही वाचा: अमेरिका, ब्रिटनला महागाई दराचे चटके

पंतप्रधानांच्या या भाषणामुळे या सार्वजनिक बैठकीतलं वातावरण चांगलंच तापलं. माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Ex-PM Imran Khan) यांच्यावरही शरीफ यांनी टीका केली आहे. इम्रान खान यांनी देशाला उच्चांकी महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली, असं म्हणत शरीफ यांनी टोला लगावला आहे. पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांसाठीही त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाच जबाबदार धरलं आहे.

Web Title: I Will Sell My Clothes To Provide Wheat Flour To People Says Shehbaz Shariff On Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanShehbaz Sharif
go to top