esakal | पाकमध्ये आढळली पंचमुखी हनुमानाची मुर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Idols artefacts found at Hindu temple in Karachi

पाकिस्तानमध्ये 1500 वर्षापुर्वीची पंचमुखी हनुमानाची मुर्ती आढळळी आहे.

पाकमध्ये आढळली पंचमुखी हनुमानाची मुर्ती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कराचीः पाकिस्तानमध्ये 1500 वर्षापुर्वीची पंचमुखी हनुमानाची मुर्ती आढळळी आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त श्री रामनाथ महाराज यांनी दिली.

शहरातील सोल्जर बाजारामध्ये ऐतिहासीक पंचमुखी हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराचे काम सुरू असताना काही मुर्ती आढळल्या आहेत. पाकिस्तानमधील पंचमुखी मंदिराचे काम सुरू असताना प्रभू राम व हनुमान यांनी भेट दिली होती, अशी आख्यायिक आहे.

शहरामध्ये असलेल्या या मंदिरामध्ये हिंदू व मुस्लिम भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर हे अतिषय जुने असून, 1500 वर्षापूर्वीचे असावे. मंदिराच्या पडझडीदरम्यान या मूर्ती गाडल्या गेल्या असाव्यात. खोदकाम करत असताना या मुर्ती आढळल्या आहेत, असे मंदिराचे रवी दावानी यांनी सांगितले.

loading image
go to top