
"ट्रम्प ट्विटरवर परतल्यास..."; तर्कवितर्कांना एलॉन मस्कचं उत्तर
न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील निवडणुकांनंतर उसळलेल्या हिंसेसाठी दोषी असल्याचे मानण्यात आले होते. त्यानंतर हिंसाचार भडकवल्याप्रकणी ट्रम्फ यांच्या ट्वीटर अकाउंटवर कायमची बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता ट्वीटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ट्रम्फ यांच्यावरील बंदी मागे घेण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्फ ट्वीटरवर पुन्हा सक्रीय झाल्यास संभाव्य गोष्टी काय असतील याबाबत Dogecoin निर्माता बिली मार्कस जे ट्वीटरवर शिबेतोशी नाकामोटो या नावाने सक्रिय आहेत.त्यांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. या अंदाजांना एलॉन मस्क यांनीदेखील सहमती दर्शवत अगदी बरोबर असल्याचे म्हटले आहे.
नाकामोटो यांनी वर्तवलेले अंदाज काय?
1. डोनाल्ड ट्रम्प ट्विटर वापरणार नाहीत. किंवा
2. डोनाल्ड ट्रम्प एकच ट्विट करतील जसे की, "ही साइट खराब आहे. सत्य सोशलवर या.
3. जर, पहिल्या दोन शक्यता पूर्ण झाल्या नाही तर, एखाद्याला ब्लॉक करण्याचा किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय नेहमी उपलब्ध असेल. असे म्हणत कोण काळजी घेतो असे मार्कस यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्यावरील कारवाई चुकीची
दरम्यान, यापूर्वी ट्रम्प यांच्यावर घेण्यात आलेला बंदीचा निर्णय नैतिकदृष्ट्या चुकीचा होता असे म्हटले आहे. तसेच या बंदीमुळे ट्रम्प यांनी त्यांचे स्वतःचे ट्रुथ सोशल नावाचे मीडिया प्लॅटफॉर्म तयार केले यामुळे हजारो वापरकर्ते दूर गेल्याचे म्हटले आहे.
Web Title: If Donald Trump Gets Back To Twitter Elon Musk Agrees To These 3 Scenarios
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..