Loksabha 2019 : भाजप उमेदवारच म्हणतो, जिन्नांना पंतप्रधान केले असते तर...

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

- मोहम्मद अली जिन्ना होते एक वकील आणि विद्वान व्यक्ती.

नवी दिल्ली : मोहम्मद अली जिन्ना एक वकील आणि विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळी निर्णय घेतला असता तर आपले पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना झाले असते. त्यांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार गुमानसिंह डामोर यांनी केले.

डामोर यांना भाजपकडून मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जिन्ना यांच्याबाबतच्या वक्तव्याचे वृत्त आज तकने दिले आहे. यामध्ये डामोर यांनी सांगितले, की स्वातंत्र्यावेळी जर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाचा आग्रह धरला नसता तर देशाचे दोन तुकडे झाले नसते. मोहम्मद जिन्ना एक वकिल, एक विद्वान व्यक्ती होते. जर त्यावेळी निर्णय घेतला असता तर आपल्या देशाचे पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना बनले असते. भारत देशाचे तुकडे करण्यासाठी फक्त काँग्रेस पक्ष जबाबदार. 

तसेच डामोर पुढे म्हणाले, 1942 मध्ये जेव्हा भारत छोडो आंदोलन झाले होते. तेव्हा पंतप्रधानपदासाठी अनेकांना दावेदारी केली होती. काँग्रेसमध्ये अनेकांची इच्छा होती की नेहरू पंतप्रधान बनावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Jinnah had been made the PM then the country would not have been divided says Gumansingh Damor