नोकऱ्या निर्माण करू, जनकल्याण करू : हॅरिस

पीटीआय
Friday, 14 August 2020

कोरोना परिस्थिती योग्य रितीने हाताळली गेली नसल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकी जनतेच्या कल्याणाकरता विविध कायदे आणि योजना राबविण्याबरोबरच महिलांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरिस यांनी आज मतदारांना नोकरीचे आश्‍वासन दिले आहे. ज्यो बिडेन हे अध्यक्षपदावर निवडून आल्यास देशात लाखो नोकऱ्या निर्माण करू, पर्यावरण बदलाविरोधात लढू आणि अमेरिकी जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवू, असे हॅरिस यांनी  प्रचारावेळी सांगितले. 

ज्यो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी आज पहिली संयुक्त प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या साडे तीन वर्षांच्या कारभारावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने देशाचे नुकसान झाले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, कोरोना परिस्थिती योग्य रितीने हाताळली गेली नसल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकी जनतेच्या कल्याणाकरता विविध कायदे आणि योजना राबविण्याबरोबरच महिलांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. देशात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चोवीस तासांत निधी वाढला
अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांनी ‘रनिंग मेट’ म्हणून कमला हॅरिस यांचे नाव घोषित केल्याचा त्यांना तत्काळ फायदा झाला. गेल्या चोवीस तासांत बिडेन यांच्या निधीत २.६ कोटी डॉलरची भर पडली आहे. यापूर्वीच्या एका दिवसातील जमा झालेल्या निधीच्या विक्रमापेक्षा ही रक्कम दुप्पट आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Joe Biden is elected president we will create millions of jobs in the country