esakal | अटल बोगद्यामुळं चीनचा जळफळाट; बोगदा उडवून देण्याची ग्लोबल टाइम्सची भाषा
sakal

बोलून बातमी शोधा

china mod

चीनची सरकारी वाहिनी ग्लोबल टाईम्सने भारताला धमकी दिली आहे

अटल बोगद्यामुळं चीनचा जळफळाट; बोगदा उडवून देण्याची ग्लोबल टाइम्सची भाषा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बिजिंग- चीनची सरकारी वृत्त वाहिनी ग्लोबल टाईम्सने भारताला धमकी दिली आहे, भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरु झाले तर भारताने नुकतेच बनवलेल्या अटल बोगद्याला उद्धवस्त केले जाईल, असं म्हणण्यात आलं आहे. चिनी वृत्तपत्राने एका विशेषज्ञांच्या हवाल्याने आरोप केलाय की, हा भारतीय भाग खूप कमी लोकसंख्येचा आहे आणि या बोगद्याचा उद्देश लष्करासाठी वापरण्याचा आहे. मात्र, भारताला या बोगद्याचा काही वापर करु देणार नाही. 

'हिपेटाइटिस सी'च्या शोधासाठी तिघांना वैद्यकीय नोबेल पुरस्कार जाहीर

चिनी तज्ज्ञांने ग्लोबल टाईम्समध्ये लिहिलं आहे की, अटल बोगद्याचा युद्धादरम्यान काहीही उपयोग होणार नाही. चिनी सैन्याकडे असे उपकरणे आहेत, ज्यामुळे या बोगद्याला उद्धवस्त केले जाईल. त्यामुळे भारताने संयम ठेवला पाहिजे. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये खूप अंतर आहे. चीनच्या पीएलएची पूर्ण तयारी आहे. लढाईसाठी भारत चीनपेक्षा खूप मागासलेला आहे.

बोगदा बनल्यामुळे लेहपासूनचे अंतर झाले कमी

चिनी विशेषज्ञ शोंग झोंगपिंग यांना मान्य केले की, बोगदा बनवण्यात आल्याने लेहपासूनचे अंतर खूप कमी होणार आहे. यामुळे भारताला राजनैतिक तयारीसाठी मोठी मदत मिळेल. झोंगपिंग पुढे बोलताना म्हणाले की, भारत चिनी सीमेजवळ रस्ता आणि पुल बनवत आहे, दौतल बेग ओल्डीकडे जाणारा 255 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला झाहे. भारत 73 महत्वपूर्ण रस्ते बनवत आहेत, जे हिवाळ्याच्या दिवसातही सुरु राहतील. 

भारत पायाभूत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे, पण सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसी क्षमता नाही. भारताकडे उंच डोंगरांवर रस्ते बांधण्याचा पुरेसा अनुभव नाही. युद्धाच्यावेळी अटल बोगद्याचा काहीही उपयोग होणार नाही. भारतीय नेत्यांनी या बोगद्याचा उपयोग केवळ दाखवण्यासाठी केला आहे. यामुळे त्यांना केवळ राजकीय फायदा होऊ शकतो, असंही झोंगपिंग म्हणाले आहेत. 

राफेलचा पहिल्यांदाच वायुसेना दिवस परेडमध्ये समावेश; जग्वार, सुखोईही दाखवणार दम

दरम्यान, जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी मनालीत आले होते. रोहतांग पास इथं असलेला हा बोगदा समुद्र सपाटीपासून 3 हजार 60 मीटर उंचीवर आहे. हा बोगदा खुला झाल्यानं हिमाचल प्रदेशातील अनेक भाग जिथं बर्फवृष्टीच्या काळात वाहतूक ठप्प होते ती आता सुरू राहिल. मनाली आणि लेहमधील अंतरही यामुळे जवळपास 50 किलोमीटरने कमी होणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या या बोगद्याची लांबी 9 किमी इतकी आहे. मनाली लेह हायवेवर रोहतांग, बारालचा, लुंगालाचा ला आणि तालंग ला यांसारखे पास आहेत पण बर्फवृष्टीच्या काळात इथून जाणं अशक्य होते. याआधी मनाली ते सिस्सू अंतर पार करण्यासाठी 5 ते 6 तास लागत होते ते आता फक्त एक तासात जाता येणार आहे. अटल बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तयार केला आहे.