प्रतिपिंडांच्या प्रतिसादात बदल; लशीच्या विकासाला नवी दिशा मिळणार

प्रतिपिंडांच्या प्रतिसादात बदल; लशीच्या विकासाला नवी दिशा मिळणार
Updated on

लंडन,- कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आपले शरीर प्रतिपिंडे (ॲंटिबॉडिज) तयार करते, हे एव्हाना बहुतेकांना माहित झाले आहे. कोरोनाला प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वैज्ञानिक तपासत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या म्युकस मेंब्रेनमध्ये आढळणारी ‘आयजीए’ प्रतिपिंडे इतर प्रकारच्या प्रतिपिंडांपेक्षा सक्रिय असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म्युकस मेंब्रेन म्हणजे शरीरातील विविध पोकळ्यांत आढळणारा, अंतर्गत अवयव झाकणारा श्लेमल पडदा होय. फ्रान्समधील सोरबॉन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी कोरोनाच्या १५९ रुग्णांवर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष ‘सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या ताज्या संशोधनामुळे लशीच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते कोरोना रुग्णांच्या म्युकस मेंब्रेनमधील ‘आयजीए’ प्रकारच्या प्रतिपिंडांनी ‘आयजीएम’ व ‘आयजीजी’ या प्रतिपिंडांनी इतर प्रतिपिंडांपेक्षा ‘सार्स कोव-२’ विषाणुला लवकर प्रतिसाद दिला. एरवी ‘आयजीएम’ प्रकारची प्रतिपिंडे प्रतिकारशक्तीला सर्वांत पहिला प्रतिसाद देत असल्याने हा निष्कर्ष अनपेक्षित आहे. रुग्णांना कोरोनाची लक्षणे सर्वप्रथम जाणवू लागल्यानंतरच्या सुरवातीच्या तीन ते चार आठवड्यानंतर प्रतिपिंडात हा बदल होत असल्याचे निरीक्षण वैज्ञानिकांनी नोंदविले. रुग्णांच्या लाळेतील आयजीए प्रतिपिंडे अनेक आठवड्यापर्यंत टिकत असल्याचाही वैज्ञानिकांचा दावा आहे. ‘आयजीए’ स्त्रवणाऱ्या प्लाझमाब्लॅस्टस या पेशींमुळे आयजीएच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. कोरोना विषाणु हल्ला करत असलेल्या श्वसनमार्गाच्या पृष्ठभागावरील श्लेष्मल त्वचेवर त्या केंद्रित होतात. ‘आयजीजी’ पेक्षा ‘आयजीए’ प्रतिपिंडे विषाणुला नामोहरम करण्यास अधिक सक्षम असल्याचेही आढळले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com