Expulsion: इमामने राष्ट्रीय झेंड्यांचा अपमान केला; थेट देशातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण?

france Expulsion of a person : राष्ट्रीय झेंड्याचा अपमान करणाऱ्या एका व्यक्तीला थेट देशातूनच हाकालण्यात आलं आहे. फ्रान्सचे मंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी याची माहिती दिली आहे.
Imam insulted national flags
Imam insulted national flags

पॅरिस- राष्ट्रीय झेंड्याचा अपमान करणाऱ्या एका व्यक्तीला थेट देशातूनच हाकालण्यात आलं आहे. फ्रान्सचे मंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी याची माहिती दिली आहे. एका कार्यक्रमामध्ये इमामने फ्रान्सच्या झेंड्याला राक्षसी झेंडा म्हटलं होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.(Imam insulted national flags in france Expulsion of a person from the country )

इमामने मात्र स्वत:वरील आरोप फेटाळून लावले होते. झेंड्याचा अपमान करण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता, असा दावा त्याने केला आहे. महजौब हे ट्युनेशियाचे आहेत. ३८ वर्षांपूर्वी ते फ्रान्समध्ये आले होते. ते फ्रान्सच्या दक्षिणेकडील एका छोट्या शहरात एका मशिदीचे इमाम म्हणून काम करत होते.

Imam insulted national flags
Maratha Reservation: 'सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

महजौब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये इमामने देशाच्या झेंड्याला राक्षसी झेंडा म्हणत असल्याचं ऐकायला मिळत आहे. ते व्हिडिओमध्ये असंही म्हणतात की, अल्लाहसाठी याची किंमत काहीही नाही. मात्र, यानंतर इमामने दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की मी काही गुन्हा केला असले तर दिलगिरी व्यक्त करतो. झेंड्याविषयी बोलताना जिभ घसरली, असं ते म्हणाले.

डर्मैनिन यांनी गुरुवारी सोशल मीडियावर सांगितलं की, महजोब महजौबी यांना देशाबाहेर काढण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे. एका नव्या कायद्यामुळे हे शक्य झालं आहे. अटक झाल्यानंतर १२ तासामध्ये आरोपीला पकडण्यात आले आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचा हेतू ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी हा इशारा आहे.

Imam insulted national flags
Alexei Navalny: नवाल्नी यांचे पार्थिव अखेर आईकडे सोपवले; हृदयावर एक ठोसा मारल्याने मृत्यू झाल्याचा दावा

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महजौब महजोबी यांना गुरुवारी ट्युनिशिया येथे वापस पाठवण्यात आले आहे. त्यांच्या वकिलाने सांगितले की त्यांच्या हद्दपारीविरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com