Maratha Reservation: 'सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

जालना- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Manoj Jarange Patil
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं 10 टक्के आरक्षण दिलं - एकनाथ शिंदे

ब्राह्मणी कावा मला फडणवीस दाखवत आहेत. पण, फडणवीस काय चिज आहे हे मला माहिती आहे. अनेक नेत आज भाजपमध्ये का येत आहेत. छगन भुजबळ, अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाही. अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत. पण, फडणवीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.

भाजपला मोठे करणाऱ्या मुंडे बहिणींची काय अवस्था करण्यात आली आहे. त्यांची घुसमट सुरु आहे. धनंजय मुंडे सध्या गपगार बसले आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे मी सलाई देखील घेणे सोडून दिले आहे. फडणवीस यांच्या मनात असतं तर लगेच सगेसोयऱ्याचा निर्णय झाला असता, असं जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation Case : सकल मराठा समाजातर्फे जळगावात रास्ता रोको; जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा

देवेंद्र फडणवीसांसोबत दोन-तीन मराठ्यांचे आमदार आहेत. शिंदेचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. पण, मी पण शेतकऱ्याचा, मराठ्याचा मुलगा आहे. मी फडणवीसांना पुरुन उरेन. देवेंद्र फडणवीसांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य तेच चालवत आहेत. फडणवीसांना कुणी पुढे गेलेलं आवडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

नारायण राणेंच्या माध्यमातून मला काहीही बोलायला लावलं जात आहे. ५ महिने झाले फडणवीस गुन्हे मागे घ्यायला तयार नाहीत. मी माझ्या समाजासाठी काम केलं तर काय चूक केली. माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या. मी लगेच सागर बंगल्यावर येतो. त्यांना माझा बळी हवा आहे. मला काही झालं तर माझा मृतदेह त्यांच्या दारात नेऊन टाका. मराठ्यांत आणि गरिब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे, अशी घणाघाती टीका जरांगेंनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com