esakal | 'रहस्यमयी' पत्नीला सांगितल्याशिवाय इम्रान खान करत नाही कोणतंही काम!
sakal

बोलून बातमी शोधा

bushra imran

पाकिस्तानच्या प्रथम महिला बुशरा बीबी लग्नापासूनच सर्व जगासाठी एक रहस्य बनल्या आहेत

'रहस्यमयी' पत्नीला सांगितल्याशिवाय इम्रान खान करत नाही कोणतंही काम!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या प्रथम महिला बुशरा बीबी लग्नापासूनच सर्व जगासाठी एक रहस्य बनल्या आहेत. लग्नानंतरच्या दिर्घ काळानंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पहिल्यांदाच आपल्या रहस्यमय पत्नीसोबत असलेल्या संबंधाबाबत अनेक खुलासे केले आहेत. इम्रान खान यांनी त्यांची पत्नी खूप बुद्धिमान असल्याचे म्हटलं आहे. तसेच सरकार संबंधी प्रत्येक मुद्द्यावर ते पत्नीशी चर्चा करत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

बुशरा यांच्यावर पडद्यामागून सरकार चालवत असल्याचा आरोप होत असताना इम्रान खान यांचे वक्तव्य आले आहे. बुशरा बीबी यांच्यावर जादू-टोण्याचेही आरोप लागले आहेत. इम्रान खान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मी आपल्या पत्नीसोबत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करतो. सरकार चालवताना आणि कठीण परिस्थितीमध्ये येणाऱ्या समस्यांचाही यात समावेश आहे. 

पोलिसांची कारवाई लोकशाहीसाठी घातक, वरुण गांधींची ठाकरे सरकारवर टीका

बुशरा बीबीशिवाय माझे जीवन सहज नव्हते

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की मुर्ख व्यक्तीच प्रत्येक मुद्द्यावर आपल्या पत्नीचा सल्ला घेत नाहीत. बुशरा बीबी माझ्या साथीदार आहेत. त्यांच्याशिवाय माझे जीवन इतके सोपे राहिले नसते. इम्रान खान यांनी यशस्वीरित्या सरकार चालवण्यासाठी बुशरा बीबी यांना क्रेडिट दिले आहे. 

इम्रान खान यांच्या पक्षातील महिला खासदार उज्मा कारदार यांचा एक ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात उज्मा यांनी इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा दावा करण्यात आला आहे. उज्मा यांनी यात म्हटलं की, 'पाकिस्तानचे सरकार इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी चालवत आहेत. इम्रान आपल्या पत्नीला विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत. बुशरा बीबी इम्रान यांचा चेहरा वाचतात. बुशरा यांनी घरात एक लाईन ओढली आहे. यापूर्वी आम्ही इम्रान खान यांच्या घरी जाऊ शकत होतो, पण बुशरा बीबी आल्यानंतर अनेकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शाह महमुद कुरैशी यांनाही आतमध्ये येऊ दिले जात नाही.