भारताचा विकास दर घटणार?; ९.५ टक्के राहण्याचा IMFचा अंदाज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं ३ टक्क्यांनी घटीचा अंदाज
IMF
IMF

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जगभरातील अर्थव्यवस्थांच्या विकास दराचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार, भारताचा विकास दर सन २०२०-२१ मध्ये ९.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत या विकास दरात तीन टक्क्यांनी घट वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी IMF नं नोंदवलेला अंदाज १२.५ टक्के होता. IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकच्या (WEO) ताज्या रिपोर्टनुसार, या वर्षी एप्रिल महिन्यात IMFनं जाहीर केलेल्या अंदापेक्षा भारताची ३०० पॉईंटनं घसरण झाली आहे. (IMF projects 9 point 5 Perc growth rate for India in 2021 and 8 point 5 pec for 2022 aau85)

IMFनं जागतीक जागतीक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ६ टक्के वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, IMFनं आर्थिक वर्ष २०२२२-२३चा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा ८.५ टक्के केला आहे. हा पहिल्या अंदाजाच्या १.६ टक्के जास्त आहे.

कोरोना लसीमुळं जगाची दोन भागात विभागणी

भारताच्या विकास दरात घट होण्यामागं मार्च ते मे दरम्यान आलेली कोरोनाची दुसरी लाट कारणीभूत आहे. कोरोनाच्या लाटेमुळं रिकव्हरीचा रेट कमी झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं IMFनं म्हटलं आहे. यामध्ये लसींची उपलब्धता हा प्रमुख दोष होता. कारण यामुळे जागतीक अर्थव्यवस्था दोन भागात विभागली गेली. पहिल्यामध्ये ते देश आहेत ज्यांची लसीपर्यंत पोहोच आहे. त्यांना या वर्षाअखेर आर्थिक बाबी सामान्य होण्याची आशा आहे. तर दुसऱ्या भागात ते देश आहेत जिथे कोरोनाचं संक्रमण पुन्हा निर्माण होऊ शकतं तसेच मृत्यूही ओढवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com