

Shehbaz Sharif
esakal
पाकिस्तान सरकारने गर्भनिरोधक उत्पादनांवरील (Condom) १८ टक्के सामान्य विक्री कर तात्काळ हटवण्याची विनंती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला केली होती, मात्र आयएमएफने ती स्पष्टपणे नाकारली आहे. हा निर्णय पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे, कारण देशात गर्भनिरोधके स्वस्त आणि सहज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न यामुळे बाधित होत आहेत. विशेषतः पाकिस्तानची लोकसंख्या जगातील सर्वात जलद वाढणाऱ्या लोकसंख्यांपैकी एक असताना हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.