

Imran Khan returns to Adiala Jail after medical examination
esakal
Imran Khan Health Update: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अदियाला कारागृहातून इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर अवघ्या सहा तासांतच त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात इम्रान यांना पुन्हा त्यांच्या कोठडीत नेले.