
पाकने पुन्हा आळवला ‘काश्मीर राग’; ‘OIC’मध्ये खंत व्यक्त
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीर प्रश्नी भारतावर कोणाचाही दबाव नसल्याची खंत त्यांनी इस्लामीक सहकार्य परिषदेत (ओआयसी) व्यक्त केली.
‘ओआयसी’ची परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठक आज इस्लामाबादमध्ये झाली. या बैठकीत इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. ‘आपण संघटना म्हणून काश्मीर आणि पॅलेस्टाइन या दोन्ही प्रश्नांवर अपयशी ठरलो आहोत. कारण आपल्यातच मतभेद आहेत, हे त्या दोघांना (भारत आणि इस्राईल) माहिती आहे,’ असे इम्रान खान म्हणाले. भारत सरकारने ३७० वे कलम रद्द केल्याचा संदर्भ देत इम्रान म्हणाले की, या मुद्द्यावरून भारतावर कोणताही दबाव आणता आलेला नाही. हा दबाव आणण्यासाठी इस्लामिक देशांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याची गरज नाही. मात्र, आपण एकत्र नसलो तर अशा घटना घडत राहतील.
इम्रान खान यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले असतानाच त्यांनी ‘काश्मीर राग’ आळवलाे. येत्या काही दिवसांत त्यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. भारतानेही, ‘काश्मीर हा भारताचा अविभाग्य भाग होता, आहे आणि भविष्यातही राहिल,’ असे वारंवार स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने हे वास्तव स्वीकारावे आणि भारतविरोधी प्रचार थांबवावा, असे आवाहनही भारताने केले आहे. अमेरिका, चीनसह अनेक देशांनी आणि संयुक्त राष्ट्रांनीही, हा द्वीपक्षीय प्रश्न असल्याचे स्पष्ट करूनही पाकिस्तान संधी मिळेल तेथे हा मुद्दा उपस्थित करत आहे.
Web Title: Imran Khan Oic Kashmir Crisis International Level
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..