इम्रान खान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम काढून घेतल्यानंतर थयथयाट करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन उद्या (ता.14) रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान या ठिकाणी विधिमंडळासमोर भाषणदेखील करणार आहेत. या वेळी इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहतील.

इस्लामाबाद - भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम काढून घेतल्यानंतर थयथयाट करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन उद्या (ता.14) रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान या ठिकाणी विधिमंडळासमोर भाषणदेखील करणार आहेत. या वेळी इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित राहतील. इम्रान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे मुझफ्फराबादला रवाना होणार असून येथे ते सर्वपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. इम्रान या वेळी हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मिरी नेत्यांशी देखील संवाद साधणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan in Pakistan Based Kashmir