इम्रान खान यांचा शपथविधी 14 रोजी 

पीटीआय
रविवार, 5 ऑगस्ट 2018

यापूर्वी इम्रान खान यांनी 11 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी केली जात असून, चर्चेच्या माध्यमातून कनिष्ठ सदनातून पुरेसे संख्याबळ प्राप्त झाल्याचा दावा पीटीआय पक्षाने केला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान हे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 14 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. 270 जागांपैकी 116 जागा "पीटीआय'ने जिंकल्या आहेत. 

यापूर्वी इम्रान खान यांनी 11 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी केली जात असून, चर्चेच्या माध्यमातून कनिष्ठ सदनातून पुरेसे संख्याबळ प्राप्त झाल्याचा दावा पीटीआय पक्षाने केला आहे. नव्या पंतप्रधानांनी 14 ऑगस्टला शपथ घ्यावी, अशी माझी आणि काळजीवाहू पंतप्रधान सेवानिवृत्त न्यायाधीश नसिरुल मुल्क यांची इच्छा असल्याचे काळजीवाहू कायदामंत्री अली जफर यांनी म्हटले आहे.

11 ऑगस्ट किंवा 12 ऑगस्टला सभागृहाचे अधिवेशन बोलवता येईल. जर अधिवेशन 11 ऑगस्टला सुरू झाले, तर इम्रान खान चौदा ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan sworn in on 14th