पाकिस्तान सरकार म्हणतंय, दुसरा पर्यायच नाही; इम्रान खानला अटक होणार

Imran Khan to be arrested
Imran Khan to be arrestedImran Khan to be arrested

सत्तेतून बाहेर पडताच इम्रान खानने शाहबाज शरीफ यांच्या नवोदित सरकारविरोधात मोर्चा उघडला आणि निदर्शने सुरू केली. तसेच स्वातंत्र्य मोर्चाची घोषणा केली. परंतु, आता शाहबाज सरकारही आडवा येण्याच्या मनःस्थितीत आहे. बुधवारी पेशावरहून इस्लामाबादला जाताना इम्रान खान (Imran Khan) आणि पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांना ताब्यात (Imran Khan) घेण्याचा निर्णय घेतल्याचे पाकिस्तान (Pakistan) सरकारने म्हटले आहे. (Imran Khan to be arrested)

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी स्वातंत्र्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लाहोरमध्ये स्वातंत्र्य मोर्चासाठी पीटीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. पीटीआयच्या लाहोर युनिटने कार्यकर्त्यांना बत्ती चौकात जमण्यास सांगितले होते. तेथून ते इस्लामाबादला रवाना होणार होते. दुसरीकडे सरकारने निदर्शनास परवानगी दिली नाही आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली.

Imran Khan to be arrested
ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुस्लिम धर्मगुरूही संतापले; म्हणाले...

पीटीआय कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी लाहोरमध्ये प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले आहेत. खासदार एजाज चौधरी आणि महमुदूर रशीद यांना अटक करण्यात आली आहे. लाहोर पोलिसांनी दावा केला आहे की स्थानिक पीटीआय नेत्यांच्या घरावर छापा टाकताना शस्त्रे जप्त करण्यात आली होती.

परिस्थिती अनियंत्रित झाली तेव्हा अधिकाऱ्यांनी एजन्सीच्या बैठकीत निर्णय घेतला की इम्रान खान (Imran Khan) यांना अटक (arrest) केली जाईल. लाँग मार्चदरम्यान त्यांना अटक करणे अशक्यप्राय वाटत असले तरी संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडे त्यांना ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगण्यात येत आहे.

Imran Khan to be arrested
इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

पीटीआय कार्यकर्ते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या कोणत्याही प्रतिकाराला तोंड देण्यासाठी सज्ज असतील. सरकारी एजन्सीला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, अशा परिस्थितीत संघर्ष शक्य आहे. सध्या पोलिस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू आहे.

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

लाहोरमधील बत्ती चौकात जमलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, कार्यकर्त्यांचा जमाव बॅरिकेड तोडण्यासाठी पुढे आला तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com