esakal | कोंबडीच्या रक्तानं पिढी घडवण्याचा 'चीनी प्रयोग'
sakal

बोलून बातमी शोधा

कोंबडीच्या रक्तानं पिढी घडवण्याचा 'चीनी प्रयोग'

कोंबडीच्या रक्तानं पिढी घडवण्याचा 'चीनी प्रयोग'

sakal_logo
By
अक्षय साबळे

बिजिंग : चीनमधील पालकांमध्ये एक नवीन ट्रेंड आला आहे. पालक आपल्या मुलांना ‘सुपर किड्स’ होण्यासाठी कोंबडीच्या रक्ताचे इंजेक्शन देत आहेत. यामुळे मुलांच्या आरोग्याशी संबंधित असणारे प्रश्न दूर होत असून, ते चपळ बनत असल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.

हेही वाचा: इसिसनं मला फसवलं, बरबाद केलं

सिंगापुर पोस्टच्या अहवालानुसार, कोबंडीच्या रक्ताचे इंजेक्शनबद्दल अनेक तर्क वितर्त लढवले जात आहेत. जसे की, इंजेक्शन घेतल्यानंतर कॅन्सर आणि केस गळतीपासून मुक्तता मिळते. कोंबडीच्या रक्तात असलेल्या स्टेरॉईड्समुळे मुले खेळात आणि अभ्यासात पारंगत होतात, असंही त्यामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच बीजिंग, शांघाय आणि गुआंगझू या शहरांमध्ये चिकन बेबीची क्रेझ वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नव्या पिढीला चीन घालतोय जन्माला

चीन आपल्या देशातील मुलांच्या भविष्याबद्दल मोठी पावले उचलत आहे. ऑनलाइन गेम्सचे ‘गुलाम’ होणाऱ्या मुलांवर अंकुश ठेवण्यासाठी मोबाईल स्क्रीनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ज्यामुळे डोळ्यांना होणारा त्रास काहीसा कमी करु शकते. नॅशनल मेंटल हेल्थ डेवलपमेंटनुसार, चीनमधील मुलांमध्ये डोळ्यासंबंधी जास्त समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे. उच्च माध्यमिक 81 टक्के तर माध्यमिक कक्षेतील 71 टक्के मुलांची दृष्टी कमजोर असल्याचे देखील यामध्ये सांगण्यात आले आहे.

loading image
go to top