esakal | इसिसनं मला फसवलं, बरबाद केलं; दहशतवाद्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Shamima Begum

शमीम बेगमने 2014 मध्ये यूके (UK) सोडले आणि आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी सीरिया (Syria) गाठली.

इसिसनं मला फसवलं, बरबाद केलं

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सीरिया : जिहादमध्ये (Jihad) सामील होण्यासाठी वयाच्या 15 व्या वर्षी सीरियाला गेलेल्या आयएसआयएसच्या ISIS दहशतवाद्याची पत्नी शमीमा बेगमला (Shamima Begum) आता तिच्या देशात पुन्हा परत जायचं आहे. जिहादींनी तिची दिशाभूल केल्याचा दावा तिनं केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून तिची फसवणूक झाल्याचंही तिनं सांगितलंय.

द सनच्या वृत्तानुसार, शमीम बेगमने 2014 मध्ये यूके (UK) सोडले आणि आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी सीरिया (Syria) गाठली. त्यावेळी ती फक्त 15 वर्षांची होती. तिथं पोहोचल्यानंतर तिथल्या एका इसिसच्या दहशतवाद्याशी तिनं लग्न केलं आणि त्याच्यासोबतच जिहादमध्ये सामील झाली. या लग्नानंतर तिला 2 मुलेही झाली.

हेही वाचा: 'बरादर अभी जिंदा है!' तालिबाननं जारी केला जिवंत असल्याचा पुरावा

अमेरिका-रशिया हल्ल्यात पतीची हत्या

दरम्यानच्या काळात इसिसच्या दहशतवाद्यांनी सीरिया आणि इराकचा मोठा भाग काबीज केला आणि तिथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हत्याही केली. यानंतर अमेरिका आणि रशियासह अनेक देशांनी सीरिया-इराकमधील दहशतवाद्यांविरोधात मोहिमा सुरू केल्या. ज्यामध्ये मोठ्या संख्येनं इसिसचे दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात शमीमा बेगमचा पतीही ठार झाला होता.

शमीमाला ब्रिटनमध्ये बंदी

सिरिया-इराकमधून इसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा आणि तिच्या दहशतवादी पतीचा मृत्यू झाल्यानंतर, शमीमाने ब्रिटनला (यूके) परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे लक्षात येताच ब्रिटिश सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये तिचं नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश जारी केले. सरकारने स्पष्ट आदेश दिले की, तिनं कधीच देशात पाऊल ठेवायचं नाही, तेव्हापासून शमीमा सीरियातील निर्वासित छावणीत राहत आहे.

हेही वाचा: काबुलमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यावसायिकाचे अपहरण

दहशतवाद्यांनी मला फसवलं

गुड मॉर्निंग ब्रिटनसह थेट प्रसारणात प्रथमच जगाशी बोलताना शमीमा बेगमनं स्वतःला पूर्णपणे निर्दोष घोषित केलंय. तिनं सांगितंल की, जेव्हा मी लहान होते, तेव्हा आयएसच्या दहशतवाद्यांनी फूस लावली होती आणि त्यावेळीच मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय माझ्यासाठी पश्चाताप होता. आता माझी मरण्याची इच्छा झाली आहे. मी परत इसिसकडे कधीच जाणार नाही, असा तिनं निर्धार केलाय.

मी ब्रिटन सरकारला मदत करेन

आयएस दहशतवाद्याची पत्नी शमीमानं दावा केलाय, की तिनं जिहादमध्ये सहभाग घेतला नव्हता. ती फक्त तिच्या मुलांची काळजी घेत होती. मला मुस्लिम असल्याच्या नावाखाली इंटरनेटवर फसवलं गेलंय. मला सांगण्यात आलं की, ब्रिटनमध्ये राहून तू चांगली मुस्लीम होऊ शकत नाहीस, त्यामुळे तिला जिहादमध्ये सामील होण्यासाठी सिरीयाला जावं लागलं, असंही तिनं स्पष्ट केलंय. शमीमा म्हणाली, की मला पुन्हा ब्रिटनला येण्याची संधी द्यायला हवी. जेणे करुन मी सरकारला जिहादी आणि दहशतवाद्यांविरोधातील युद्धात पाठिंबा देऊ शकेन. तिनं आपल्या अनुभवाच्या आधारे सरकारला मदत करण्याची इच्छा व्यक्त केलीय.

loading image
go to top