Elon Musk News
Elon Musk NewsSakal

Twitterची मोठी कारवाई! पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात केलं ब्लॉक

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर तिसऱ्यांदा कारवाई

जेव्हापासून एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी स्विकारली तेव्हापासूनच ट्विटर या-ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरने आपल्या पॉलिसीमध्ये अनेक फेरबदल केल्याचे दिसून येत आहेत. अशातच आता ट्विटरने मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केलं आहे.

ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतामध्ये ब्लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरच्या गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीनंतर ट्विटर हँडल ब्लॉक करावे लागते.

Elon Musk News
Military Rule In Myanmar : चाळीस पक्षांवर अमान्यतेची कुऱ्हाड!

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणामध्ये भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलं आहे की, "भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे."

Pakistan Twitter account
Pakistan Twitter account Esakal
Elon Musk News
Visa Reform Bill : ‘एच-१बी’ आणि ‘एल-१’प्रक्रिया पारदर्शी

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्याची ही आत्तापर्यंतची तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि अकाउंट भारतात पुन्हा दिसू लागलं होतं. आता पुन्हा ट्विटरने भारतात पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.

Elon Musk News
USA Crime News : भारतीय वंशाच्या मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांची शिक्षा; निकाल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com