esakal | काबुलमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यावसायिकाचे अपहरण
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

काबुलमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यावसायिकाचे अपहरण

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानात तालिबानचे (Afganistan taliban) जनतेवरील अत्याचार आणि दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तालिबान्यांनी भारतीय वंशाच्या (Indian origin) एका अफगाणि व्यावसायिकाचं अपहरण (businessman kidnapped) केल्याची माहिती आहे. तालिबानी बंडखोरांनी काबुलमध्ये (Kabul) बंदुकीच्या धाकावर एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचं अपहरण केलं आहे. बंसरी लाल अरेन्देही असं अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज तकने हे वृत्त दिले आहे.

बंसरी लाल शीख समुदायातून येतात. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चढोक यांनी ही माहिती दिली. बंसरी लाल ५० वर्षांचे असून त्यांचा औषध निर्मितीचा कारखाना आहे. तालिबान्यांनी मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास कारखान्याजवळून त्यांचे अपहरण केले. तालिबान्यांनी बंसरीसह त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही किडनॅप केले होते. पण हे कर्मचारी कसे-बसे तिथून निसटण्यात यशस्वी ठरले.

हेही वाचा: देशासोबत गद्दारी, पाकला सिक्रेट माहिती देणाऱ्या DRDO च्या चौघांना अटक

कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. बंसरी यांचे कुटुंब दिल्ली-एनसीआरमध्ये राहत असल्याची माहिती पुनीत सिंह यांनी दिली. स्थानिय तपास यंत्रणांनी बंसरी यांचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला या घटनेची माहिती देण्यात आली असून तात्काळ हस्तक्षेप करण्याची आणि मदतीची मागणी केली आहे, असे पुनीत सिंह यांनी सांगितले.

loading image
go to top