Navy : 'आयएनएस जटायू’चा नौदलात समावेश

नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत लक्षद्वीपमध्ये कार्यक्रम
Navy
Navy esakal

मिनिकॉय (लक्षद्वीप) ः भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे ‘आयएनएस जटायू’ या तळाचा बुधवारी नौदलात औपचारिकरीत्या समावेश करण्यात आला. सध्या चीन व मालदिवबरोबर भारताचे संबंध ताणलेले असून नौदलाच्या या नव्या तळामुळे भारताची सागरा ताकद वाढणार आहे.

Navy
Mumbai Health News: कोरोनानंतर मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्येत वाढ

‘आयएनएस जटायू’मुळे नौदलाला पश्चिम अरबी समुद्रातील चाचेगिरी आणि अमली पदार्थ विरोधी कारवाया आता सुलभपणे करता येतील. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या हस्ते या तळाचा समावेश आज नौदलात करण्यात आला. कमांडंट व्रत बघेल हे ‘आयएनएस जटायू’चे नेतृत्व करणार आहेत.

Navy
Health Care News : ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायद्याचे आहेत टोमॅटो; पण लाल की हिरवे?

मिनिकॉयमधील कार्यक्रमानंतर बोलताना ॲडमिरल कुमार म्हणाले, रामायण या ऐतिहासिक महाकाव्यातील जटायू या पक्षाचे नाव नौदलाच्या नव्या तळाला दिले आहे. रामायणात सीतेच्या अपहरणाला जटायूने पहिल्यांदा विरोध केला होता. स्वत:च्या जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्रथम प्राधान्य देण्याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. म्हणूनच या नौदलाच्या तळाचे नामकरण ‘जटायू’ असे केले आहे. संरक्षण, पाळत ठेवणे आणि निःस्वार्थ सेवेच्या भावनेचा हा सन्मान आहे.’

‘‘जटायूने ​​प्रभू रामाला दिलेली माहिती महत्त्वपूर्ण माहिती दिल्याने त्यांचे शोधकार्य यशस्वी झाले. त्याचप्रमाणे हे जहाज भारतीय नौदलाला संपूर्ण प्रदेशाची वास्तव सागरी माहिती पुरवेल. पूर्वेकडे ‘आयएनएस बाझ’ आणि आता पश्‍चिमेकडे ‘आयएनएस जटायू’ देशहिताचे रक्षण करण्यासाठी नौदलाचे डोळे आणि कान म्हणून काम करेल,’’ असा विश्वास नौदल प्रमुखांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com