Mumbai Health
Mumbai Health sakal

Mumbai Health News: कोरोनानंतर मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्येत वाढ

जागतिक लठ्ठपणा दिनविशेष

भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा


Mumbai News: कोविडनंतर मुलांमध्ये लठ्ठपणा आणि वजन वाढीच्या समस्येत वाढ झाली आहे. सायन रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या ओबेसिटी ओपीडीमध्ये जास्त वजन असलेल्या मुलांची संख्या दुपटीने वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुलांमध्ये जास्त वजनाची समस्या लठ्ठपणात बदलू नये, यासाठी डॉक्टर त्यांना आहार नियोजन आणि कौटुंबिक समुपदेशनाद्वारे मदत करत आहेत.

Mumbai Health
Mumbai Health News: तापाने फणफणले मुंबईकर; वातावरण बदलाचा थेट फटका

मुलांमधील लठ्ठपणासाठी विशेष ओपीडी असणारे सायन रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव पालिका रुग्णालय आहे. सायन रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. निकिता शाह यांनी सांगितले की, गेल्या दशकात आहार पद्धतीत खूप बदल झाला आहे. अनेक जण प्रक्रिया केलेले आणि जंक फूड खाऊ लागले आहेत.

पूर्वी लठ्ठपणाची समस्या केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांमध्येच दिसून येत होती; परंतु आता कमी उत्पन्न असलेले कुटुंबातील मुलांमध्ये ही समस्या वाढत आहे. पूर्वी मुले कबड्डी, लंगडी, क्रिकेट असे मैदानी खेळ खेळायची, आता मोबाईलचा वापर वाढल्यानंतर मुले घरातच राहतात. ऑनस्क्रीन वेळ वाढला आहे आणि शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. या कारणांमुळे वजनवाढ आणि लठ्ठपणाची समस्या वाढत आहे.

Mumbai Health
Mumbai News: गोखले पुलाची मार्गिका सुरू; पण कोंडी ‘जैसे थे’

बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. राधा घिलडियाल आणि डॉ. अलका जाधव यांनी लठ्ठपणासाठी २०१७ मध्ये स्वतंत्र ओपीडी केली. दरवर्षी २० जास्त वजनाची आणि लठ्ठ मुले सायनच्या दोन्ही रुग्णालयात येतात. यापैकी १० टक्के लोक लठ्ठपणाचे बळी आहेत. कोविडपूर्वी ही संख्या निम्मी होती, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai Health
Mumbai Local News: लोकल लेट होण्याचे टेंशन होणार कमी; पाचव्‍या-सहाव्‍या मार्गिकेचा मार्ग मोकळा

अजूनही जागरुकतेचा अभाव
मुलांमध्ये लठ्ठपणाबाबत अजूनही जागरुकतेचा अभाव आहे. डॉ. शहा यांनी सांगितले की, गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील लोक आमच्याकडे येतात. सुमारे ९० टक्के पालकांना लठ्ठपणा म्हणजे काय आणि त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात हे माहीत नाही.

Mumbai Health
Mumbai Metro: ‘मेट्रो-९’ मार्गावर साडेआठ तासांत बसवले २२ गर्डर!

आहार पद्धतीत बदल आवश्‍यक


डॉ. शहा या जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ मुलांना आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करतात. तसेच कुटुंबालाही त्यांच्या आहार पद्धतीत बदल करावा लागेल. जर तुम्ही मुलांना एक बिस्किट किंवा जंक फूड सोडून देण्यास सांगितले तर ते अधिक जिद्दी होतील. त्यामुळे मुलांव्यतिरिक्त आम्ही पालकांचेही समुपदेशन करतो. ही एक मोठी प्रक्रिया आहे; परंतु जर त्याचे पालन केले तर मुलांचे वाढते वजन कमी होते.

लठ्ठपणाचे दुष्परिणाम
मधुमेह, उच्च रक्तदाब, थकवा जाणवणे, कॅल्शियमची कमतरता आणि सांधेदुखी

Mumbai Health
Navi Mumbai: आदित्य ठाकरे आज नवी मुंबईत; कोणावर साधणार निशाणा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com