मोहिमांतील शांतिसैनिकांसमोरील धोक्यांमध्ये वाढ | Campaign | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहिमांतील शांतिसैनिकांसमोरील धोक्यांमध्ये वाढ
मोहिमांतील शांतिसैनिकांसमोरील धोक्यांमध्ये वाढ

मोहिमांतील शांतिसैनिकांसमोरील धोक्यांमध्ये वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जीनिव्हा - जगभरातील अनेक देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्ष अधिक तीव्र आणि गुंतागुंतीचा झाल्याने ८७ हजारांहून अधिक शांतिसैनिकांना धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचे प्रमुख जिन पिअरे लॅक्रॉइक्स यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

संघर्षग्रस्त देशांमध्ये वाढलेला वांशिक संघर्ष आणि वाढत्या दहशतवादी कारवाया, यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली असल्याचे लॅक्रॉइक्स यांनी सांगितले.

ते म्हणाले की ‘‘दोन तीन वर्षांपूर्वीपर्यंत शांतिसैनिकांना संबंधित देशांच्या सरकारकडून सुरक्षित वातावरण मिळत होते. ही परिस्थिती आता राहिलेली नाही. याशिवाय, संघर्षही आता वेगवेगळ्या स्वरुपात आणि स्तरांवर होत आहे. स्थानिक संघर्षाचे लोण पसरत देशपातळीवर, आणि काही वेळा इतर देशांमध्येही पसरत आहे. आफ्रिकेतील सालेह भागाचे उदाहरण देता येईल. यामुळे ८७ हजारांहून अधिक शांतिसैनिकांना धोका निर्माण झाला आहे.’’

शांतिमोहिमांबाबत ‘यूएन’च्याच काही सदस्यांत फूट असल्याने मोहिमेच्या अंमलबजावणीवर आणि निधी उपलब्ध करून देण्यात काही अडचण येत असल्याची नाराजी लॅक्रॉइक्स यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

संघर्ष वाढण्याची कारणे

  • संघर्षग्रस्त भागात सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे किंवा चिथावणीखोर विधानांमुळे संघर्षात तेल ओतले जाते

  • वांशिक वादात वाढ

  • काही देशांचा ताबा सत्ताधारी आणि बंडखोर यांच्यात विभागला गेल्याने दीर्घकाळ अस्थिरता

कार्यक्षमता वाढविण्याची संधी

जिन पिअरे लॅक्रॉइक्स यांच्या मते, पुढील महिन्यात दक्षिण कोरियात शांतता मोहिमांबाबत होणाऱ्या बैठकीत शांतिसैनिकांना अधिक संरक्षण देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याची संधी आहे. चकमकी, स्फोटके आणि हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शांतिमोहिमांमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांना कशाची आवश्‍यकता आहे, याबाबत सदस्य देशांना एक निवेदन पाठविले असल्याचेही लॅक्रॉइक्स यांनी सांगितले.

loading image
go to top