esakal | भारताचा उदारपणा; इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापराला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan

भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे.

भारताचा उदारपणा; इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्र वापराला परवानगी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे. इम्रान खान पुढील आठवड्यात मंगळवारी आपल्या काही मंत्र्यांसोबत आणि अन्य प्रतिनिधींसोबत दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जात आहेत. यासाठी त्यांना भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करण्याची आवश्यकता होती. भारताने यासाठी परवानगी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

सौदी महिलांना लष्कराची दारं खुली; तिन्ही सैन्य दलातील प्रवेशाला मंजुरी

विशेष म्हणजे 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानकडे हवाई क्षेत्र वापरु देण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यासाठी नकार दिला होता. पाकिस्तानने जम्मू-काश्मिरमध्ये होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करत मोदींच्या हवाई क्षेत्र वापराला परवानगी नाकारली होती. 

मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासोबत द्विपक्षीय भेटीचा कार्यक्रम आहे. यादरम्यान व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटनासंबंधी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने सांगितलं की, राजपक्षे यांच्या निमंत्रणामुळे इम्रान खान अधिकारिकरित्या श्रीलंकेला जाणार आहेत.