भारताच्या नकारात्मक प्रतिसादामुळे निराश : इम्रान खान

वृत्तसंस्था
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

''भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. मात्र, भारताच्या नकारात्मक आणि अहंकारी प्रतिसादामुळे निराश झालो आहे. भारत गर्विष्ठ, नकारात्मकतेने भरलेला देश आहे''. 

- इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान

इस्लामाबाद : ''भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. मात्र, भारताच्या नकारात्मक आणि अहंकारी प्रतिसादामुळे निराश झालो आहे'', अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबाबत नाराजी व्यक्त केली. "मी आपल्या आयुष्यात अशा छोट्या लोकांना भेटलो, जे लोक कार्यालयांमध्ये मोठ्या पदांवर बसले. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे'', असेही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांतीसाठी नुकताच चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, पाकिस्तानाकडून कुरापती सुरुच असल्याने भारताकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी भारताबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. मात्र, भारताच्या नकारात्मक आणि अहंकारी प्रतिसादामुळे निराश झालो आहे. भारत गर्विष्ठ, नकारात्मकतेने भरलेला देश आहे''. 

दरम्यान, पाकिस्तानने शांतीचा प्रस्ताव दिल्यानंतर या काळात सीमेपलीकडून झालेले दहशतवादी हल्ले, भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना आणि घुसखोरीमुळे भारताने पाकिस्तानचा निषेधही व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is arrogant and negative says Imran Khan