esakal | भारत सहाव्यांदा बनला UNHRC चा सदस्य; मिळाली 'इतकी' मतं, 'या' देशांचाही समावेश I India
sakal

बोलून बातमी शोधा

UNHRC
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये भारताची पुन्हा निवड झालीय.

भारत सहाव्यांदा बनला UNHRC चा सदस्य; मिळाली 'इतकी' मतं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये United Nations Human Rights Council (UNHRC) भारताची पुन्हा निवड झालीय. भारताला यात 193 पैकी 184 मते मिळाली आहेत. UNHRC मध्ये भारताचा कार्यकाळ 2022 ते 2024 पर्यंत असेल. सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर भारतानं सांगितलं की, मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आदर, संवाद आणि सहकार्याद्वारे काम करत राहील. यूएनएचआरसीचे सदस्य संयुक्त राष्ट्रामध्ये गुप्त मतदानाने निवडले जातात.

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने ट्विट करून UNHRC चे सदस्य म्हणून निवडल्याबद्दल माहिती दिलीय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, की भारत UNHRC मध्ये सहाव्यांदा प्रचंड बहुमतानं पुन्हा निवडला गेलाय. संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी भारतावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार, तर दुसर्‍या ट्विटमध्ये, भारतीय मिशननं म्हटलंय, की आम्ही मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आदर, संवाद, सहकार्याद्वारे काम करत राहू, अशी त्यांनी ग्वाही दिलीय.

हेही वाचा: इस्लामाबाद : लष्करप्रमुखांशी इम्रानचे बिनसले

संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं अर्जेंटिना, बेनिन, कॅमेरून, एरिट्रिया, फिनलँड, झांबिया, होंडुरास, भारत, कझाकिस्तान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, मोंटेनेग्रो, पॅराग्वे, कतार, सोमालिया, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका यांचीही गुप्त मतदानाने निवड केलीय.

हेही वाचा: 'शाही सिंहासन' न सोडता नेदरलँडचे राजघराणेही करू शकणार 'समलिंगी विवाह'

मानवाधिकार परिषद ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे, जी जगभरातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी काम करते. या परिषदेची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेच्या माध्यमातून 2006 साली करण्यात आली. पूर्वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग हे काम करत असे. संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय (OHCHR) मानवी हक्क परिषदेचे सचिवालय म्हणून काम करते. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे.

हेही वाचा: फेसबुकनुसार 'सनातन संस्था' धोकादायक

UNHRC चे सदस्य कसे निवडले जातात?

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये 47 सदस्य देशांचा समावेश आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेद्वारे निवडले जातात. यामध्ये आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातून 13-13 सदस्य निवडले जातात. याशिवाय, दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन देशांमधून 8 सदस्य, पश्चिम युरोपमधून 7 आणि पूर्व युरोपमधून 6 सदस्य निवडले जातात.

loading image
go to top