esakal | चीनचा होकार नकाराबरोबरीचाच; सकारात्मक चर्चेनंतरही सीमारेषेवरील कुरापती सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

India, China, Border

दोन्ही राष्ट्रांतील उच्चस्तरिय लष्कर स्तरावरील बैठक 14 जूलैला पार पडली होती. या बैठकीत पेंगोंगमधील परिस्थितीवर खास चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही राष्ट्रांनी तणावपूर्ण वातावरण कमी करण्यासाठी मागे हटण्याच्या तोंडी प्रस्तावाला सहमती दर्शवली होती.  

चीनचा होकार नकाराबरोबरीचाच; सकारात्मक चर्चेनंतरही सीमारेषेवरील कुरापती सुरुच

sakal_logo
By
सुशांत जाधव

लडाख : भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन्ही राष्ट्रांतील  द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत. सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रांतील कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांच्यातील चौथ्या बैठकीनंतरही चिनी सैन्याच्या पेंगोंग परिसरातील हालचाली कमी झाल्याचे दिसत नाही.  चिनी सैन्य फिंगर-5 परिसरात अजूनही तैनात आहे. मागील सहा दिवसांत त्यांनी याठिकाणाहून पावले मागे टाकल्याचे संकेत दिसत नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंगोंगमधील परिस्थिती पूर्वीप्रमाणेच आहे. चिनी सैन्य फिंगर 4 परिसरातून माघारी हटले असले तरी फिंगर 5 ते फिंगर 8  परिसरात अजूनही चिनी सैन्य गस्त घालत आहे. 

कोरोनावरील उपायांचे स्वरूप व दिशा

दोन्ही राष्ट्रांतील उच्चस्तरिय लष्कर स्तरावरील बैठक 14 जूलैला पार पडली होती. या बैठकीत पेंगोंगमधील परिस्थितीवर खास चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही राष्ट्रांनी तणावपूर्ण वातावरण कमी करण्यासाठी मागे हटण्याच्या तोंडी प्रस्तावाला सहमती दर्शवली होती.  पण चर्चेतील सकारात्मकता पेंगोंग परिसरात पाहायला मिळत नाही. गलनान खोरे, गोगरा, हाट स्प्रिंग्स आणि फिंगर 4 परिसरातून चिनी सैन्य मागे सरकले असले तरी संपूर्ण फिंगर परिसरातून त्यांनी मागे जाण्याची गरज आहे, असा उल्लेख सरकारी सूत्रांनी केलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेपसांग परिसरात देखील चिनी सैन्य अधिक प्रमाणात तैनात असणे ही चिंतेची बाब असून फिंगर परिसरातील सद्य परिस्थिती भारतीय सुरक्षा दलाची चिंता वाढवणारी आहे. फिंगर परिसरात भारताच्या हद्दीतील भूभागावर चिनी सैन्य असून या मुद्यावरुन भारत-चीन यांच्यात आणखी काही बैठकींची सत्रे होणे संभावित असल्याचेही सूत्रांकडून समजते. ज्या परिसरातून चिनी सैन्य मागे हटले आहे त्यासंदर्भात देखील मागील बैठकीतच चर्चा झाली होती.  गलवान खोरे, गोगरा, हाट स्प्रिंग्स या परिसरातून चिनी सैन्य दोन-तीन किमी मागे हटले आहे. त्यांनी आणखी मागे जाणे अपेक्षित असून यासंदर्भातही बैठकीत सहमती झाली होती.