द्विपक्षीय कराराचं तुमच्या सैन्याकडून उल्लंघन झालं; भारतानं चीनला सुनावलं

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 September 2020

भारत-चीन यांच्यात सीमारेषेवर वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची  बैठक पार पडली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने यावेळी पाच महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. चिनी सैन्य भारताला उसकावण्याचा प्रयत्न करत असून ही कृती द्विपक्षीय कराराचे उल्लंघन असल्याचे भारताने चीनला सुनावले आहे.

भारत-चीन यांच्यात सीमारेषेवर वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची  बैठक पार पडली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने यावेळी पाच महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. चिनी सैन्य भारताला उसकावण्याचा प्रयत्न करत असून ही कृती द्विपक्षीय कराराचे उल्लंघन असल्याचे भारताने चीनला सुनावले आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री  वांग यी यांच्यात गुरुवारी मॉस्को येथे ही बैठक पार पडली. गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन यांच्यात संघर्षमय वातावरण आहे. 

भाष्य : आघात आखाताच्या स्थैर्यावर

सीमारेषेवर असलेल्या सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही. द्विपक्षीय कराराचे पालन व्हायला हवे. मतभेदाचे रुपांतर वादात व्हायला नको, अशी चर्चाही दोन्ही नेत्यांमध्ये झाली. सीमारेषेवरील सद्यपरिस्थिती दोन्ही राष्ट्रांच्या दृष्टीने हिताची नाही. दोन्ही देशांतील सैन्यामध्ये सुरु असलेली चर्चा सुरुच राहिल, यावर एकमत झाले. तसेच सध्याच्या घडीला मागे हटण्यासंदर्भातही संमती दर्शवण्यात आली आहे.

पँगाँग त्सो जवळ महत्त्वाच्या शिखरांवर भारताचा ताबा; ‘फिंगर-४’ माऱ्याच्या टप्प्यात 

सीमारेषेवर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेल्या चिनी सैन्याबाबत भारताकडून प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. सैन्याशिवाय युद्धजन्य परिस्थिती दर्शवण्यासाठी काही उपकरणेही चिनी सैन्याने सीमारेषेवर आणल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा मुद्दाही भारताकडून उपस्थितीत करण्यात आला. चिनीकडून सुरु असलेल्या या कुरापती  1993 आणि 1996 मध्ये झालेल्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. चीनकडून या प्रश्नावर स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचेही समजते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china foreign ministers meeting agreed on five points

Tags
टॉपिकस
Topic Tags: