...तरच सैन्य माघारी फिरेल, भारताने चीनला केलं स्पष्ट

दोन्ही देशांमध्ये वर्षभरापासून सीमावाद सुरु आहे. सर्वाधिक वाद असलेल्या पँगाँग तलाव आणि अन्य भागातून चीनने सैन्य मागे घेतले आहे
India and China
India and ChinaSakal

नवी दिल्ली: लडाख सीमावादावर (Ladakh standoff) तोडगा काढण्यासाठी आज भारत (india) आणि चीनमध्ये १२ व्या कॉर्प्स कमांडर स्तराची बैठक सुरु झाली आहे. नियंत्रण रेषेजवळ चीनच्या (china) बाजूला असलेल्या मोल्डो मध्ये ही बैठक सकाळी १०.३० वाजता सुरु झाली. पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग (hot spring) आणि गोग्रा हाईटस या भागातून सैन्य माघारी बाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल. भारतीय लष्करातील सूत्रांनी ही माहिती दिली. (India China to hold 12th Corps Commander level meet on Ladakh standoff dmp82)

दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असलेल्या भागातून चीन सैन्य मागे घेणार असेल, तरच तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे भारताने स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांमध्ये वर्षभरापासून सीमावाद सुरु आहे. सर्वाधिक वाद असलेल्या पँगाँग तलाव आणि अन्य भागातून चीनने सैन्य मागे घेतले आहे. पण हॉट स्प्रिंग आणि गोग्रा हाईटसमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे.

India and China
अंकुश चौधरीचं तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन

अनेक फेऱ्यांच्या लष्करी आणि कुटनितीक स्तरावरील चर्चेनंतर तणाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पण अजूनही वाद पूर्णपणे निवळलेला नाही. मागच्यावर्षी गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते, तर चीनच्या बाजूला ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

India and China
काश्मीर: एन्काऊंटरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

चीन सीमेवर भारताचे ५० हजार सैनिक

डोकलामच्या (doklam) संघर्षापासून चीनची दादागिरी खपवून न घेण्याची भारताची रणनिती आहे. मागच्या वर्षी लडाखमध्ये (Ladakh) संघर्ष सुरु झाल्यापासून भारताने प्रत्येकवेळी चीनला जशास तसं उत्तर दिलं आहे. भारताने आता चीनला लागून असलेल्या सीमेवर (china border) ५० हजार अतिरिक्त सैन्यबळ तैनात केलं आहे. सध्या भारताचे दोन लाख सैन्य सीमेवर (army on border) लक्ष ठेवून आहेत. २०२० च्या तुलनेत ४० टक्क्याने तैनाती वाढवण्यात आली आहे.

याआधी भारताने लष्करी तैनाती केली, त्यावेळी चीनची चाल रोखणं हा त्यामागे उद्देश होता. पण आता भारताने त्यापुढचा विचार केलाय, उद्या गरज पडल्यास हल्ला करण्याच्या दृष्टीने भारताने सैन्य तैनाती केलीय. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये हे म्हटले आहे. हिमालयामध्ये युद्ध लढण्यासाठी एक वेगळं कौशल्य लागतं. या तैनातीमुळे आणखी भारतीय सैन्य हिमालयीन युद्धामध्ये पारंगत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com