NATO: ‘नाटो’चा दावा भारताने फेटाळला; युक्रेनवरून मोदी पुतीन यांच्यात चर्चा झाल्याचा आरोप अमान्य
PM Narendra Modi: भारताने नाटोच्या सरचिटणीस मार्क रुटेच्या मोदी-पूतीन युक्रेन चर्चेवरील आरोपांचा सपशेल फेटा केला. रशियन सैन्यात भरती झालेल्या २७ भारतीयांना परत पाठविण्याची मागणीही भारताने केली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युक्रेन युद्धाविषयी दूरध्वनीवर चर्चा झाल्याचा नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांचा आरोप आज भारताने फेटाळून लावला.