भारतीयांचा स्वीस बँकांतील काळा पैसा घटला !

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

ब्रिटनपाठोपाठ अमेरिका (2), वेस्ट इंडीज (3), फ्रान्स (4) आणि हॉंगकॉंग (5) या देशांचा क्रमांक लागत असून, एकूण काळ्या पैशात या देशांचा वाटा 50 टक्के इतका आहे; तर या यादीत पहिल्या 10 मध्ये समाविष्ट असलेल्या देशांतील नागरिकांनी जमा केलेल्या पैशाचे प्रमाण एक तृतीयांश असल्याची माहिती "एसएनबी'ने दिली.

झुरीच : स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत 74 व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्वीस बॅंकांत इतर देशांतील नागरिक व कंपन्यांनी जमा केलेल्या एकूण काळ्या पैशाच्या तुलनेत भारतातून जमा झालेल्या पैशाचे प्रमाण 0.07 टक्के इतके नगण्य आहे. तत्पूर्वी गेल्यावर्षी भारताने 88 वरून थेट 73 व्या स्थानावर उडी घेतली होती. 2018 अखेर जमा झालेल्या एकूण रकमेत ब्रिटनचा वाटा 26 टक्के इतका आहे. 

ब्रिटनपाठोपाठ अमेरिका (2), वेस्ट इंडीज (3), फ्रान्स (4) आणि हॉंगकॉंग (5) या देशांचा क्रमांक लागत असून, एकूण काळ्या पैशात या देशांचा वाटा 50 टक्के इतका आहे; तर या यादीत पहिल्या 10 मध्ये समाविष्ट असलेल्या देशांतील नागरिकांनी जमा केलेल्या पैशाचे प्रमाण एक तृतीयांश असल्याची माहिती "एसएनबी'ने दिली. बहामास, जर्मनी, लझ्मबर्ग, केमन ... आणि सिंगापूर हे देश "टॉप10'मध्ये आहेत. 

भारतापुढे असलेले देश 
मॉरिशस : 71 
न्यूझीलंड : 59 
फिलिपिन्स : 54 
व्हेनेझुएला : 53 
थायलंड : 39 
कॅनडा : 36 
तुर्कस्तान : 30 
इस्राईल : 28 
सौदी अरेबिया : 21 
जपान : 16 
इटली : 15 
ऑस्ट्रेलिया : 13 
यूएई : 12 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India drops down to 74th rank in money parked in Swiss banks