esakal | आर्मेनिया-अजरबैजानमधील संघर्षावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या वाद
sakal

बोलून बातमी शोधा

azarbejan and armeniya.png

दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने याची दखल घेतली असून दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

आर्मेनिया-अजरबैजानमधील संघर्षावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या वाद

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

येरेवान- युरोप आणि आशियाच्या मध्ये वसलेले दोन देश आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षात अजरबैजानच्या जनरलसह 16 सैनिकांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही देशांमध्ये 3 दशकांपासून वाद आहे. तुर्कीने या वादात उडी घेतली असून अजरबैजानचे समर्थन केले आहे. आर्मेनियाला याची किंमल चुकवावी लागेल, अशी धमकी तुर्की संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

अमेरिका चीनला देणार दणका; कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर व्हिसा बंदीची शक्यता 
रविवारी आर्मेनियाच्या सैनिकांनी उत्तर पश्चिमी सीमेवर अजरबैजानच्या चौक्यांवर तोफा डागल्याची माहिती आहे. यात अजरबैजानने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन्ही देशांची हानी झाल्याचं कळत आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने याची दखल घेतली असून दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

1990 व्या दशकात दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते. दोन्ही देशांमध्ये भूभागावरुन अनेकदा वाद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नकाशात नगर्नो-कराबाख हा अजरबैजानचा भाग आहे. मात्र, यावर आर्मेनियाच्या टोळ्यांचा ताबा आहे. सध्याचा संघर्ष हा उत्तर भागात झाला आहे. अजरबैजाननुसार तोवुज जिल्ह्यात भीषण संघर्ष झाला आहे.

अमेरिका, भारत, रशियासह जगभरातील देशांनी या संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देश सीमा भागात एकमेकांच्या नागरिकांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप करतात. अजरबैजानने आरोप केला आहे की आर्मेनियाकडून झालेल्या गोळीबारीत नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत.  तर आर्मेनियाने आरोप केला आहे की अजरबैजान त्यांच्या भागावर गोळीबार करत आहे. 

कोरोनाच्या लशीसाठी सायबर चोरी; अमेरिका, ब्रिटनचा रशियावर सर्वांत मोठा आरोप
गेल्या 30 वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये वाद आहे. दोन्ही देश एकमेकांवर वाद निर्माण केल्याचा आरोप करत असतात. रशियाने 2016 मध्ये या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली होती. त्यामुळे आता रशिया काय भूमिका घेते याकडे लक्ष्य लागले आहे. 2016 मध्ये झालेल्या 'एप्रिल वॉर' मध्ये जवळजवळ 200 सैनिक आणि काही नागरिक मारले गेले होते. 

1990 च्या दशकात या दोन्ही देशात भीषण युद्ध झाले आहे. आर्मेनियाने नगर्नो-कराबाखमध्ये मोठ्या संख्येने असणाऱ्या आर्मेनियाच्या गटाचे समर्थन केले होते. त्यानंतर 1994 मध्ये या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली होती. यानंतर नगर्नो-कराबाखमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली, यात अधिकतर लोकांनी अजरबैजानवर बहिष्कार टाकण्याच्या बाजूने मत दिले. स्थानिक लोकांनी दोन्ही देशांसोबत जाण्यापेक्षा स्वतंत्र राहण्याचे समर्थन केले. त्यानंतर 2016 मध्ये या देशांमध्ये पुन्हा तणाव वाढला. उभय देशांमध्ये 4 दिवस संघर्ष झाला. द ऑर्गनायजेशन फॉर सेक्युरिटी अँन्ड कोऑपरेश इन यूरोप दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे.