Iran-Israel War : मध्य पूर्वेतील युद्धाचा भारताला कसा बसणार फटका? महागाईची गणिते समजून घ्या

Iran-Israel War Impact on India : इराण अमेरिकेच्या युद्धाचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आयात-निर्यातीवर परिणामुळे भारताला फटका बसू शकतो.
Energy And Trade Concerns Grow In India After Gulf Escalation

Energy And Trade Concerns Grow In India After Gulf Escalation

Esakal

Updated on

US Iran Conflict May Impact India : अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खान यांच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. इराणने यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी १९८०मध्ये टँकर युद्धानंतर इराणकडून सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता इराणच्या या निर्णयामुळे जगात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. जगातील तेल आणि गॅस वाहतुकीच्या २० टक्के वाहतूक या मार्गाने होते. इराणवर हल्ल्यानंतर काही तासातच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीत तब्बल ७० टक्के इतकी घट झाली होती. तर ५५ भली मोठी तेलवाहू जहाजं इराणच्या हद्दीत अडकून पडली आहेत. यात १८ जहाजांमध्ये कच्चं तेल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com