चीनकडून 192 टक्क्यांनी आयात वाढली, केंद्रीय मंत्र्यांचा खुलासा

India vs China
India vs Chinaesakal

चिनी वस्तूंवर बंदी घालण्याच्या वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात चीनमधून भारतात होणारी आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासंदर्भात सरकारकडून आकडेवारी जाहीर झाली आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. (Balu Dhanorkar on Chinese Imports)

यानंतर मोदी सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आलंय. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर देताना ही माहिती समोर आली. मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत मोदी सरकारची चीनकडून होणारी आयात 192 टक्क्यांनी वाढल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. (Indo China Border Dispute)

चीनचं वाढतं संकट पाहता अर्थव्यवस्थेच्या बाबींवर स्वावलंबी होण्याची गरज वाढत आहे. एकीकडे सरकार चिनी मालावर बंदी घालण्याची भाषा करतं. सरकारी पाठीराखे गलवान व्हॅलीत होणाऱ्या चीनच्या घुसखोरीवर भाष्य करतात. चीनला सीमेवर रोखल्याचं सरकार सांगतं. त्याच वेळी चीनची सर्व बाजूंनी गळचेपी सुरू असल्याची माहिती मोदी सरकारचे मंत्री देतात. मात्र वाणिज्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता महत्वाची बाब समोर आली आहे. 2014 साली भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर 7 दशलक्ष डॉलर्स आयात चीनमधून करण्यात आली. मात्र यूपीए सरकारच्या तुलनेत ही वाढ 192 टक्क्यांनी वाढल्याचं आकडेवारी स्पष्ट करते.

चिनी मालावरील बहिष्काराप्रमाणेज बिजींगमध्ये पार पडणाऱ्या विंटर ऑलिम्पिक्सवर देखील भारताने बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमात पार पडणाऱ्या सोहळ्यांना भारतीय खेळाडू उपस्थिती लावणार नाहीत. गलवान व्हॅलीत सुरू असणाऱ्या घुसखोरीवरून हा निर्णय झाला आहे. या ठिकाणी घुसखोरी करणाऱ्या जवानाच्या हातात ऑलिम्पिक मशाल दिल्याने भारताने हा पवित्रा घेतलाय. मात्र, सीमेवर प्रत्युत्तराची भाषा करणाऱ्या सरकारला आर्थिकदृष्ट्या चीन महत्वाचा वाटत असल्याचं आकडेवारी सांगते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com