esakal | कधीही केमिकल शस्त्र वापरण्याला भारताचा विरोध, UNSC मध्ये ठाम भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

केमिकल शस्त्र वापराला भारताचा विरोध, UNSC मध्ये मांडली ठाम भूमिका

केमिकल शस्त्र वापराला भारताचा विरोध, UNSC मध्ये मांडली ठाम भूमिका

sakal_logo
By
दीनानाथ परब

संयुक्त राष्ट्र: फक्त अणूबॉम्बच (nuclear bomb) नाही, तर मानवजातीचं (humanbeing) मोठं नुकसान करु शकतील, अशी अनेक घातक, संहारक शस्त्र (Mass destruction weapon) आज जगात उपलब्ध आहेत. शक्तीशाली देशांबरोबरच (poweful countrys) विकसनशील देशही अशी शस्त्रास्त्र विकसित करण्याच्या मागे लागले आहेत. ज्यामुळे भविष्यात मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो. रणगाडे, फायटर विमानं, मिसाइल्स, ड्रोन टेक्नोलॉजीच्या बरोबरीने रासायसनिक शस्त्र विकसित करण्याचीही स्पर्धा जगात सुरु आहे.

भारताने UNSC मध्ये म्हणजेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सीरिया विषयीच्या चर्चेमध्ये रासायनिक शस्त्र वापराला ठाम विरोध केला आहे. रासायनिक शस्त्र अधिवेशन हे एक वेगळं, पक्षपातरहीत निशस्त्रीकरणाचं साधन आहे. जनसमूहाचा नाश करणारी घातक वर्गातील शस्त्र बाद करण्याचं हे एक मॉडेल आहे, असं आर. रविंद्र सीरिया विषयीच्या UNSC च्या बैठकीत म्हणाले. ते संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत आणि कायमस्वरुपी उपप्रतिनिधी आहेत.

हेही वाचा: बातम्यांना मिळतो जातीय रंग सर्वोच्च न्यायालयाची काही माध्यमांवर टीका

भारत रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याच्या विरोधात आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणीही, कुठेही आणि कधीही रासायनिक शस्त्रांचा वापर करु नये, अशी भारताची भूमिका रविंद्र यांनी मांडली. रासायनिक शस्त्र वापराची कुठल्याही प्रकरणाची चौकशी निपक्षपाती, विश्वासर्ह असली पाहिजे, तसेच त्यात रासायनिक शस्त्र अधिवेशनाच्या तरतुदींचे पालन झाले पाहिजे, असे रविंद्र म्हणाले.

loading image
go to top