युएनकडून कौतुकाचे उद्गार, ''भारताने करुन दाखवलं, आता जगाचं नेतृत्व करावं''

un and modi.
un and modi.

भारताने सोलर एनर्जीच्या वापरात घेतलेली आघाडी बघून आता संयुक्त राष्ट्रसंघालाही अप्रूप वाटायला लागले आहे. भारताच्या नेतृत्वात जगातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणे शक्‍य होणार असल्याचे डोहाळेही संयुक्तराष्ट्र संघाला लागले आहे. जागतिक हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जगाचे नेतृत्व भारताने करावे अशी अप्रत्यक्ष अपेक्षा संयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव अमिना महम्मद यांनी व्यक्त केली आहे. 

भारताच्या नेतृत्वात इंटरनॅशनल सोलर अलायन्सेसची स्थापनाही झाली आहे. त्याचे एक अधिवेशन दिल्लीत पार पडले होते. देशातील औद्योगिक क्षेत्रात सौर ऊर्जा वापरासाठी भारताने मोठी आघाडी घेतली आहे. महम्मद या एका ऑनलाइन वेबिनारमध्ये मागच्याच आठवड्यात भारताबद्दल हे उद्गार काढले. त्या म्हणाल्या,""जपान आणि कोरीयासह जगभरातील 110 देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी 2050 पर्यंतची टाईमलाईन निश्‍चित केली आहे. तर चीनने 2060 पर्यंत हे लक्ष्य गाठेल. भारताने सोलरमध्ये जगभरात घेतलेली आघाडी बघता, जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी निश्‍चित केलेल्या ध्येयांची लवकरच पूर्तता होईल असा विश्‍वास वाटतो.'' युरोपियन महासंघानेही 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 55 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे मनावर घेतले आहे. त्यासाठी आवश्‍यक धोरणही त्यांनी यावर्षी स्वीकारले आहे. कोळशाचा वापर कमी करण्यासाठी युरोपियन युनियन आणि ऑर्गनायझेशन फॉर इकनॉमिक कोऑपरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट या संस्थांनी नवा कोळसा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टीना डाबीची इंस्टाग्राम पोस्ट; व्यक्त केल्या भावना

जॉब वाढतात..... 

ऊर्जा निर्मितीसाठी खनिज तेलात जेवढी गुंतवणूक करावी लागते. तेवढ्याच गुंतवणुकीत अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांद्वारे आपण तीन पट अधिक रोजगार निर्मिती करू शकतो, असे महम्मद यांनी वेबीनारमध्ये सांगितले. त्या म्हणाल्या,""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच सरकारांनी आता आर्थिक आघाडीवर शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे असून, त्यासाठी स्वच्छ ऊर्जेचे धोरण स्वीकारायला हवे.'' हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात बदल करणे अनिवार्य झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com