
हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये भारत आघाडीवर, अमेरिकन खासदाराची कबुली
वॉशिंग्टन : अनेक प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेचे वर्चस्व कमी होत आहे, असा दावा अमेरिकेचे खासदार जैक रीड (US Senator Jack Reed) यांनी केला आहे. हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या (Hypersonic Technology) क्षेत्रात भारत, रशिया आणि चीन अमेरिकेच्या पुढे गेले आहेत. अमेरिका ज्या स्थितीत आहे जिथे त्याला तांत्रिक सुधारणांची गरज असून, अमेरिका तंत्रज्ञानात आघाडीवर होती, पण आता तसे राहिलेले नाही, असेही रीड यांनी म्हटले आहे. एका नामांकन सुनावणीदरम्यान रीड यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा: उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा
रीड म्हणाले की, हायपरसोनिक्सच्या बाबतीत चीन, भारत आणि रशियाने अमेरिकेला मागे टाकत पुढे गेले आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीत अमेरिकेला प्रथमच त्रिपक्षीय स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात ही आता द्विपक्षीय स्पर्धा राहिलेली नाही.
हायपरसोनिक तंत्रज्ञान म्हणजे काय?
हायपरसॉनिक तंत्रज्ञान हे क्षेपणास्त्रांच्या बाबतीत सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान मानले जाते. ध्वनीच्या वेगाच्या 5 पट जास्त वेगाने फिरणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसॉनिक असे म्हणतात. किलोमीटरमध्ये, 6000 किमी प्रतितास पेक्षा वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसॉनिक म्हणतात. यामध्ये वेग आणि दिशा बदलण्याची क्षमता खूप चांगली आहे. यामुळे, त्यांचा माग काढणे आणि पाडणे कठीण असते. अलीकडेच रशियाने युक्रेन युद्धात किंजल या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केला आहे.(Hypersonic Technoly News In Marathi)
Web Title: India Leads In Hypersonic Technology Says Us Senator Jack Reed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..