
परदेशात जाऊन आपली हलाखीची परिस्थिती सुधारणं, आलिशान आयुष्य जगणं, खऱ्या अर्थानं जग बघण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. असंच स्वप्न केरळमधील एका गरीब घरात जन्मलेल्या निमिषानेही पाहिले. घरची परिस्थिती बेताची होती. आई मोलकरणीचं काम करायची. गरिबीतून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी 19 वर्षांची असतानाच निमिषा प्रियाने २००८ साली येमेन गाठले. तिथे सरकारी रुग्णालयात ती नर्स म्हणून कामाला लागली. सगळं काही बरं होईल या आशेनं येमेनला गेलेल्या निमिषाचं पुढच्या ६-७ वर्षात सारं जगंच बदललं.