
थोडक्यात
येमेनमधील केरळची नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा सना येथील उच्चस्तरीय बैठकीनंतर रद्द करण्यात आली.
भारतीय ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियर यांच्या हस्तक्षेपामुळे येमेनी विद्वानांशी चर्चा यशस्वी झाली.
निमिषा प्रियाच्या प्रकरणातील पुढील कार्यवाही मृत तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाशी चर्चेवर अवलंबून आहे.
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या केरळची नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंठापुरम एपी अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने असा दावा केला आहे, परंतू केंद्र सरकारकडून अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही आणि येमेन सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.