India-Pakistan: अमित शहांच्या वक्तव्याने पाकचा जळफळाट; भारतावर गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Pakistan

अमित शहांच्या वक्तव्याने पाकचा जळफळाट; भारतावर गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोवा : भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण गोव्यात एका कार्यक्रमावेळी देशाच्या सीमा सुरक्षेबद्दल केलेल्या वक्तव्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. अमित शहांनी म्हटलं होतं की, भारताच्या सीमेबाबत कोणत्याही प्रकारची छेडछाड केलेली सहन केली जाणार नाही. भविष्यात गरज पडली तर भारत सर्जिकल स्ट्राइक करेल.

सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आम्ही जगाला सांगितलं आहे की, भारत आता दहशतवाद्यांना सहन करणार नाही. २०१६ मध्ये आमच्या जवानांनी शत्रूच्या घरात घुसून हल्ल्याचा बदला घेतला होता. इथून पुढेही असे झाले तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल जे त्यांना समजतं. दरम्यान, आता अमित शहांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: पूरग्रस्तांसाठीचे पॅकेज फसवे : चंद्रकांत पाटील

पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं की, हे भ्रम पसरवणारं वक्तव्य आहे. भारतीय गृहमंत्र्यांनी पाकिस्तानमध्ये कथित सर्जिकल स्ट्राइकची दिलेली धमकी ही बेजबाबदारपणा आणि चिथावणीखोर आहेत. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. भाजप आणि आरएसएसच्या धोकादायक प्रवृत्ती यातून दिसून येतात. यांचा उद्देश फक्त प्रादेशिक तणाव निर्माण करणे इतकाच आहे. पाकिस्तानशी शत्रुत्वाचे त्यांचे वक्तव्य विचारधारा आणि राजकीय पातळीवर फायदा मिळवून देतात असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानने भारतावरसुद्धा काही आरोप केले आहेत. त्यात म्हटलंय की, भारतात पसरत असलेला दहशतवाद आणि जम्मू काश्मीरमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनापासून आंतरराष्ट्रीय कम्युनिटिचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तान नेहमीच याकडे लक्ष वेधत आहे. कारण यामध्ये पाकिस्तान आणि काश्मीरी लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो.

२०१९ मध्ये भारताने बालाकोटमध्ये केलेल्या स्ट्राइकवर पाकिस्तानने लगेच प्रत्युत्तर दिलं होतं. यातून दिसून येतं की, भारताला रोखण्यासाठी आमच्याकडे लष्कर तयार आहे आणि आमची ताकद कमी नव्हती असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

loading image
go to top